सामाजिक

कौठा येथे पूरग्रस्तांचे आमरण उपोषण सुरू; ४१ वर्षांनंतरही पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क कंधार:- ०८ सप्टेंबर 

कंधार तालुक्यातील कौठा येथे वारंवार येणाऱ्या पुरामुळे गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मंजूर करण्यात आलेले प्लॉट अद्यापही वाटप  झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी ०७ सप्टेंबर पासून आमरण उपोषणाबसले आहेजोपर्यंत प्लॉट धारकांना प्रत्यक्ष जागा दाखवून दिली जात नाहीतोपर्यंत हे उपोषण सुरूच राहीलअसा थेट इशारा राजेश विठ्ठल देशमुख यांनी प्रशासनाला दिला आहे.

कौठा गावात वारंवार पूरस्थिती निर्माण होत असल्याने शासनाने गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतलाहोतात्यानुसारसन १९८३ मध्ये गट क्रमांक ७६३ मध्ये तब्बल ३५७ प्लॉट मंजूर करण्यात आले होतेमात्रचार दशकांहून अधिक काळ लोटूनही प्रशासनाने अद्याप प्लॉट धारकांना प्रत्यक्ष जागा आणि प्लॉट दाखवलेले नाहीतन्याय मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी अनेक अर्ज केलेतसेच साखळी आमरण उपोषणेही केलीपरंतु प्रशासनाने याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.

यापूर्वी ग्रामस्थांनी केलेल्या आमरण उपोषणाची दखल घेत उपजिल्हाधिकारी मासंजीव मोरे यांनी तहसीलदारांना पत्राद्वारे या प्रश्नावर लवकरात लवकर मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या होत्यात्यावेळीप्रशासनाने १५ दिवसांत पुनर्वसनाचा मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन दिले होतेमात्रया आश्वासनालाआज २० दिवस उलटून गेले तरी कोणतीही कार्यवाही  झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रशासनाच्या या टोलवाटोलवीचा आणि उदासीनतेचा निषेध करत राजेश विठ्ठल देशमुख यांनीआजपासून कौठा येथे पुन्हा एकदा बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहेउपोषणाच्या पहिल्या दिवशीत्यांना पाठिंबा देण्यासाठी भुजंग देविदास देशमुखराजेश्वर विश्वनाथ बिडवेशिवहर चंद्रकांत देशमुखशिवराज वैजनाथ इंदौरे आणि मोहन भाऊराव कांबळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होतेप्रशासनाने आता तरी गांभीर्याने दखल घेऊन पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावाअशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button