सामाजिक

मेहनत आणि कुटुंबाची साथ असेल तर अशक्यही शक्य; डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांनी मुंबईत पटकावलेविधी शाखेचे सुवर्णपदक

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- १० सप्टेंबर २६

स्वप्नांना मेहनतीची जोड आणि कुटुंबाची भक्कम साथ लाभली तर कोणतेही ध्येय अशक्य नसते,” हेमुखेडचे सुपुत्र डॉश्रीहरी बुडगेमवार यांनी आपल्या उत्तुंग यशातून सिद्ध करून दाखवले आहेमुंबईविद्यापीठाशी संलग्न असलेल्या नामांकित सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून एलएलबी परीक्षेत सलग तीन वर्षेप्रथम क्रमांक पटकावत त्यांनी मानाचे सुवर्णपदक प्राप्त केले

 सप्टेंबर रोजी सिद्धार्थ विधी महाविद्यालय (फोर्टमुंबईच्या सभागृहात संपन्न झालेल्या दीक्षांतसोहळ्यात त्यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले.

या l कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त अध्यक्षमान्यायमूर्ती सुनील बीशुक्रे यांनीभूषविलेतर प्रमुख पाहुणे म्हणून मान्यायमूर्ती सुरेंद्र तावडेसिद्धार्थ लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉकेसुधाकर रेड्डीप्राडॉदादासाहेब सूर्यवंशीप्राॲडदिशा पाटील आणि प्राॲडश्रद्धा राठोड आदीमान्यवर उपस्थित होते.

आपले मनोगत व्यक्त करताना डॉश्रीहरी बुडगेमवार भावनिक झालेते म्हणाले: “स्वप्ने नक्कीच पूर्ण होतातपण ती सत्यात उतरवण्यासाठी संपूर्ण कुटुंबाची साथ लागतेहे यश केवळमाझे नसून संघर्षाच्या काळात माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे आहेहे सुवर्णपदक जितके माझेआहेतितकेच ते माझी पत्नी अनुषा हिचे आहेतिच्या निरपेक्ष प्रेमानेसंयमाने आणि खंबीर साथीशिवायहे यश शक्य नव्हतेत्याचबरोबर माझे गुरूमातापिता आणि शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळेचमाझ्या विचारांना योग्य दिशा मिळाली.”

त्यांनी आपल्या यशात वरिष्ठमित्रकनिष्ठ सहकारी आणि हितचिंतकांच्या पाठिंब्याचाही कृतज्ञतापूर्वकउल्लेख केला. “न्यायाच्या मार्गावर चालण्याच्या प्रवासाची ही केवळ सुरुवात आहे,” असा ठाम निर्धारहीत्यांनी या वेळी व्यक्त केलाडॉश्रीहरी बुडगेमवार यांच्या या देदिप्यमान यशाबद्दल मुखेड तालुक्यासहसंपूर्ण नांदेड जिल्ह्यातून आणि सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button