मुखेडमध्ये ‘भारत जोडो’च्या वर्षपूर्तीनिमित्त भव्य वॉकेथॉन; राष्ट्रीय एकता व आरोग्याचा दिला संदेश

युवक, महिला, विद्यार्थी व नागरिकांचा मोठा सहभाग; विजेत्यांना खा. प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्तेपारितोषिक वितरण
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: ०८ सप्टेंबर २६
भारत जोडो यात्रेच्या ५ व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून मुखेड शहर काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित करण्यातआलेल्या ‘राष्ट्रीय एकता पदयात्रा‘ आणि ‘भव्य वॉकेथॉन‘ स्पर्धेला शहरवासीयांचा उदंड प्रतिसादमिळाला. या उपक्रमातून राष्ट्रीय एकता, सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि निरोगी जीवनशैलीचा संदेशजनतेपर्यंत पोहोचविण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा ‘भारत यात्री‘ डॉ. श्रावण रॅपनवाड यांच्या संकल्पनेतूनया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर वमराठवाडा भूषण डॉ. दिलीप पुंडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संजीवनीसकाळ समूह, जय श्रीराम आरोग्यदायी मंडळ, जिप्सी मॉर्निंग ग्रुप यांसह शहरातील युवक, महिला आणिविद्यार्थी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते.

ही वॉकेथॉन स्पर्धा महिला, पुरुष, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अशा चार गटांत पार पडली. यामध्ये सौ. शीतल राजेमोड (महिला गट), प्रकाश राठोड (पुरुष गट), विश्वजीत राठोड (विद्यार्थी गट) आणि वैष्णवीसुरवसे (विद्यार्थिनी गट) यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. पहिल्या तीन विजेत्यांनाअनुक्रमे ५,५५५ रुपये, ३,५५५ रुपये आणि २,५५५ रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊनगौरविण्यात आले.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनीआरोग्यासाठी नियमित चालण्याचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी, “मुखेडकरांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे भारत जोडो यात्रेची आठवण पुन्हा जागीझाली,” अशी भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमास आयोजक शहराध्यक्ष हनमंत नारनाळीकर,राजे छत्रपती अकॅडमीचे संचालक ज्ञानेश्वर डुमणे,ज्येष्ठ नेते माधवराव पाटील, चंद्रकांत घाटे, बालाजी बंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भालचंद्रनाईक, ज्ञानेश्वरजी डुमने सर, कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर, प्रा. अखिल येवतीकर, शिवशंकरपाटील कलंबरकर, सुनील आरगीळे, सचिन गुद्दे, शेख रियाज, सुरेश पा. बेळीकर, बालाजी वाडेकर, इरफान शेख, दिनेश केरुरकर, गजु मोरे, एम. आर. गोपनर, सतीश पा. केरुरकर आदींसह काँग्रेसपदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस उपनिरीक्षक अभिजित तुतरवाड आणि त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवल्याने हा उपक्रमसुरळीत पार पडला. सर्व सहभागी स्पर्धकांना काँग्रेस कमिटीतर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यातयेणार आहे.



