सामाजिक

बालाजी पाटील खतगावकर यांची ‘स्वाधार’ प्रकल्पास भेट; पर्यावरणपूरक घरकुलाचे केले कौतुक

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १५ नोव्हेंबर २६

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचे सचिव तथा सगरोळी येथील संस्कृतीसंवर्धन मंडळाचे माजी विद्यार्थी बालाजी पाटील खतगावकर यांनी ११ नोव्हेंबर रोजी खानापूर (पुनर्वसन) येथील ‘स्वाधार’ प्रकल्पास भेट दिली. यावेळी त्यांनी पूर्ण झालेल्या पहिल्या पर्यावरणपूरक घरकुलाचीपाहणी करून या अभिनव आणि कमी खर्चातील घरबांधणी उपक्रमाचे कौतुक केले. तसेच, प्रकल्पाच्यापुढील वाटचालीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचा फटका बसलेल्या नांदेड जिल्ह्यातील लेंडी धरणग्रस्त हसनाळ आणिरावणगाव येथील ३०० कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा, या उद्देशाने संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने‘स्वाधार’ हा महत्त्वाकांक्षी घरकुल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. खानापूर पुनर्वसन येथेपर्यावरणपूरक पद्धतीने या घरांची उभारणी केली जात असून, या उपक्रमाला नांदेड जिल्हा प्रशासनआणि मुंबई येथील ‘केअरिंग फ्रेंड्स‘ या संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

घरकुलाची ठळक वैशिष्ट्ये: या प्रकल्पातील घरे पर्यावरणस्नेही लाल मातीच्या विटांपासून तयारकरण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या घरांना प्लास्टर किंवा रंगकामाची आवश्यकता नसते. नैसर्गिकबांधकाम पद्धतीमुळे उन्हाळ्यातही घरातील तापमान तुलनेने थंड राहते आणि बांधकामाचा खर्चही खूपकमी येतो. सुमारे ४५० चौरस फूट क्षेत्रफळाची ही सुसज्ज व हवेशीर घरे लाभार्थ्यांना उपलब्ध करूनदिली जाणार आहेत.

प्रकल्पातील पहिल्या पूर्ण झालेल्या घराची पाहणी करताना श्री. खतगावकर यांनी बांधकाम पद्धती, गुणवत्ता आणि त्यातील पर्यावरणपूरक संकल्पनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यांनी लाभार्थीकुटुंबांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षाही समजून घेतल्या. आगामी दोन वर्षांत ३००कुटुंबांना या प्रकल्पाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळणार असून, प्रतीक्षा यादीतील पात्र लाभार्थ्यांनीहीया उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी संस्थेचे कार्यकर्ते अभिजित महाजन, व्यंकट शिंदे, शिवसेनेचे पदाधिकारी प्रभाकर पाटीलतांदळीकर, त्र्यंबक इंगोले यांच्यासह बिलोली, देगलूर व मुखेड येथील विविध पदाधिकारी, कार्यकर्तेआणि हसनाळ व रावणगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button