सामाजिक

दुष्काळात शिवसेनेने पोहचविला गरजू कुटूंबाच्या घरात दिवाळीचा शिधा;बिल्लाळीत वाटप केले शिधाचे किट

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- १४ नोव्हेंबर २६

 दुष्काळाच्या संकटाने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना, गोरगरीब आणि गरजू कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा या संवेदनशील भावनेतून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते ना.एकनाथ शिंदे  यांच्या वतीने आणि खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली बिल्लाळी येथे अत्यंत गरजू कुटुंबांना दिवाळी शिधा किटचे वाटप करण्यात आले.

संकटाच्या काळात सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे,त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हीच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची सामाजिक बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित झाली असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक बालाजी पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे.शिवसेनेची ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही विचारधारा प्रत्यक्ष कृतीत उतरवत ‘भगवा खांद्यावर, शिवसैनिक बांधावर’ या संकल्पनेतून सर्कलनिहाय मदतकार्य सुरू केली आहे.याच उपक्रमांतर्गत दि.१० नोव्हेंबर रोजी बिल्लाळी येथे दिवाळीचा शिधा किटचे वाटप करण्यात आले.


सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत दिवाळीसारख्या आनंदाच्या सणापासून एकही गरजू कुटुंब वंचित राहू नये,या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.शिवसेनेकडून वाटप करण्यात येत असलेल्या प्रत्येक शिधा किटमध्ये साखर १ किलो,बेसन १ किलो, गोडतेल १ किलो,रवा १ किलो,मैदा १ किलो आणि पोहे १ किलो अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येत असलेला हा उपक्रम केवळ वस्तूंचे वाटप नसून अडचणीच्या काळात गरजू कुटुंबांना दिलेला आधार आणि विश्वास आहे.


यावेळी बिल्लाळीचे पोलीस पाटील धर्माजी पाटील,जिल्हा परिषद नांदेड माजी विस्तार अधिकारी शंकरराव इंगळे, माजी सरपंच भीमराव घाटे, माजी सरपंच प्रतिनिधी गोपाळ येडुरे,वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालय बिल्लाळीचे लिपिक पुंडलिकराव कदम,बालाजी कदम,अंकुश नालापल्ले महाराज,महाराष्ट्र राज्य डी.एड,बी.एड असोसियशनचे उपाध्यक्ष संदीप कांबळे, हणमंत कांबळे,खतगावकर यांचे विश्वासू बालाजी शिंदे, बूथ प्रमुख विजय शिंदे सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button