कॉम्रेड मौला भाई शेख यांचे दुःखद निधन

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: २० नोव्हेंबर २६
एपीजे अब्दुल कलाम समाज सेवा समितीचे अध्यक्ष एस. के. बबलू यांचे वडील कॉम्रेड मौला भाई शेख ५८ वर्षे यांचे १९ नोव्हेंबर रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शेख परिवारावरदुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील सामाजिक व राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कॉम्रेड मौला भाई शेख हे अत्यंत मनमिळावू, स्पष्ट वक्ते आणि सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.सर्वसामान्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी नेहमीच आवाज उठवला. त्यांच्या जाण्याने एक मार्गदर्शक आणि ज्येष्ठ समाजसेवक हरपल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
त्यांचा दफनविधी आज दि. २० नोव्हेंबर रोजी दुपारी ०२ वाजता लोखंडे चौक जवळील गरीब नवाज मस्जिद जवळील कब्रस्तान येथे पारपडणार आहे. त्यांच्या पश्चात २ मुले, २ मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कॉम्रेड मौला भाई शेख यांच्या निधनाबद्दल एपीजे अब्दुल कलाम समाज सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच शहरातील विविध सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांनाभावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, शेख परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.




