सामाजिक

मुखेड येथे जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड (प्रतिनिधी) : २२ नोव्हेंबर २६

जननायक, क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या वतीने मुखेड येथील ओम साई प्लाझा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी कार्याचे आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले.

याप्रसंगी ज्येष्ठ समाज बांधव शिवाजीराव बोनलेवाड, शिवाजीराव येवतीकर, युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष बोनलेवाड,जगदिश आंबुलगेकर, प्रवीण मारकवाड, नागेश गोविंदवार, शंकर नाईनवाड, मनोज गंदपवाड, निलेश पोतलवाड, गजू आकुलवाड, पवन निंपुलवाड, बबलू पोतलवाड यांच्यासह समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button