सामाजिक

चोंडीत राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेच्या वतीने टिपू सुलतान जयंती साजरी.

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड:- २४ नोव्हेंबर २६

मुखेड तालुक्यातील मौजे चोंडी येथे शेर ए म्हैसूर हिंदुस्थानाचे प्रथम स्वातंत्र्य सेनानी इंग्रजा विरोधात लढणारे म्हैसूरचे पराक्रमी शासक रॉकेट तंत्रज्ञानाचे प्रणेते आणि ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे शूर योद्धा सुलतान फतेह अली साहब, हजरत टिपू सुलतान यांची जयंती राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषद या सामाजिक संघटनेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली .
   कार्यक्रमाची सुरूवात हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली तसेच त्यानंतर मिठाई वाटप करण्यात आली,
    यावेळी ग्रामपंचायत पंचायत अधिकारी सिद्धेश्वर खेळभांडे,पोलीस पाटील सचिन कांबळे,विविध सहकारी सोसायटीचर चेअरमन बालाजी बसापुरे, माजी चेअरमन सादिक शेख, माजी सरपंच पांडुरंग कंधारे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बसापुरे,राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेचे मुखेड तालुका युवा कार्याध्यक्ष शेख मुजाहिद चोंडीकर,आकाश पाटील,शरीफ शेख,शेख सूलेमान,रफिक शेख,बाबू पठाण,जुनेद शेख,गुलाब शेख,मोती शेख,नजीर मोमीन शेख,ज्ञानेश्वर मसुरवार,कृष्णा पांचाळ,इरफान शेख,रियाज शेख,ताजोदिन शेख,अमीर शेख,महमद पठाण,मौला कासार सह गावातील नागरिक,युवक,सर्व समाज बांधव व राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button