स्वतःच्या जीवाची बाजी लावून शेतकऱ्याला वाचवले : शेख बाबू पटेल यांच्या शौर्याला सलाम !

▫️लेंडी नदीत बुडणाऱ्या शेतकऱ्याला जीवनदान– बागन टाकळी ग्रामपंचायतीकडून सत्कार; शासनानेही दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी
मुखेड प्रतिनिधी:- ३० ऑगस्ट
देगलूर तालुक्यातील बागन टाकळी गावाचे शेख बाबू पटेल यांनी दाखवलेले धाडस आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. देगलूर शहराजवळील लेंडी नदीवर सकाळच्या वेळी शंकर पाटील विभुत्ते (रा. खानापूर) हे शेतकरी पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जात होते. मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असताना बाबू पटेल यांनी जीवाची पर्वा न करता नदीच्या पाण्याच्या वेगाच्या प्रवाहात धावत त्यांना सुरक्षित बाहेर काढले.
गावकऱ्यांच्या उपस्थितीत हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. पाण्याच्या प्रवाहाशी दोन हात करूनत्यांनी एका शेतकऱ्याचे जीवन वाचवले. या घटनेनंतर बागन टाकळी ग्राम पंचायतीचे उपसरपंच मौलापटेल यांच्या हस्ते शौर्यवान बाबू पटेल यांचा सत्कार करण्यात आला.
गावकऱ्यांनी या कृतीचे मनापासून कौतुक करत सांगितले की शेख बाबू पटेल यांचा सन्म ान केवळ गावापुरता मर्यादित न ठेवता शासनाने अधिकृतपणे गौरव करावा. अशा धाडसी कृतींची नोंद सरकारी स्तरावर होणे गरजेचे आहे, जेणेकरून समाजात खऱ्या वीरांना प्रेरणामिळेल. आज बागन टाकळी गाव, देगलूर तालुका आणि संपूर्ण जिल्हाभर शेख बाबू पटेल यांच्या धाडसाचा सलाम करत आहे.



