सामाजिक

मुखेड ‘महिला बाल कल्याण’ प्रकल्प कार्यालयाचीच दुरवस्था: गळके छत, चिखलाचे साम्राज्य आणिशौचालया अभावी महिलांची कुचंबणा!

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड :-३ ऑगस्ट २६

एकीकडे शासन ‘स्वच्छ भारत‘, ‘महिला सन्मान‘ आणि सक्षमीकरणाच्या मोठ्या गप्पा मारते, तर दुसरीकडे महिलांच्या हितासाठीच स्थापन झालेल्या ‘महिला बाल कल्याण विभागा‘च्या मुखेड प्रकल्पकार्यालयात महिला कर्मचाऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. कार्यालयाला गळती लागली आहे, जाण्यासाठी धड रस्ता नाही आणि सर्वात संतापजनक बाब म्हणजे कार्यालयात साधं शौचालय नसल्याने शेकडो अंगणवाडी सेविका आणि महिला कर्मचाऱ्यांना नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर बसावे लागतआहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचे आणि दुरवस्थेचे विदारक वास्तव छाया चित्रांमधून समोर आले आहे.

मुखेड येथील महिला बाल कल्याण प्रकल्प कार्यालयात जाण्यासाठी कोणताही पक्का रस्ता नाही. थोडाजरी पाऊस झाला तरी संपूर्ण परिसरात पाणी साचते आणि चोहीकडे चिखलाचे साम्राज्य पसरते. चिखलातून आणि गुडघाभर पाण्यातून वाट काढत महिला कर्मचाऱ्यांना व अंगणवाडी सेविकांना जीवमुठीत धरून कार्यालय गाठावे लागते. हा रस्ता आहे की दलदल? असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती(छायाचित्रात) निर्माण झाली आहे.

इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून छताला सर्वत्र गळती लागली आहे. पावसाचे पाणी थेटस्लॅब मधून आत टपकत असल्याने भिंतींना ओल आली आहे. कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे आणि फाईल्स भिजण्यापासून वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडत आहे. गळणारे पाणी जमाकरण्यासाठी चक्क फरशीवर बादल्या ठेवण्याची नामुष्की ओढावली असून, या कार्यालयालाच आता‘कल्याणा‘ची गरज भासू लागली आहे

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात काळीमा फासणारी गोष्ट म्हणजे, महिलांच्या विकासाचा डंका पिटणाऱ्याया कार्यालयात महिलांसाठी साधे एक स्वच्छतागृह (शौचालय) देखील नाही. मुखेड तालुक्याभरातून दररोज अनेक अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि महिला कर्मचारी येथे कामानिमित्त येतात. मात्र, नैसर्गिक हाकेला ओ देण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने या महिलांना नाईलाजाने उघड्यावर, झाडा झुडपांचा किंवा आडोशाचा आधार घ्यावा लागतो. ‘स्वच्छतेचा‘ नारा देणाऱ्या व्यवस्थेत महिलांना असा अपमान सहन करावा लागणे, यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती?

ज्या विभागावर महिलांच्या आरोग्याची आणि हक्कांची जबाबदारी आहे, तोच विभाग आपल्या महिलाकर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी आणि आत्मसन्मानाशी असा जीवघेणा खेळ कसा खेळू शकतो? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

मुखेड प्रकल्प कार्यालयाच्या इमारतीची तात्काळ दुरुस्ती करून तिथे पक्का रस्ता आणि महिलांसाठी तातडीने सुसज्ज शौचालयाची उभारणी करावी. अन्यथा, प्रशासनाच्या या भोंगळ कारभारा विरोधात तीव्रसंताप व्यक्त होण्याची शक्यता आहे. महिला बाल कल्याण विभागाने आधी स्वतःच्या कार्यालयातील महिलांचे ‘कल्याण‘ करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button