राजकीय

जीर्ण अंगणवाड्यांच्या जागी नवीन इमारती मंजूर करा; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची गट विकास अधिकाऱ्यांकडे मागणी

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नायगाव ०६ ऑगस्ट २६

मांजरम येथील सर्व अंगणवाड्यांचे तातडीने सर्वेक्षण करून तेथील जीर्ण झालेल्या इमारतींच्या जागी नवीन इमारती मंजूर कराव्यात, तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य, खेळणी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नायगावचे गट विकास अधिकारी. वानखेडे यांना निवेदन दिले.

यासोबतच, तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून थकीत असलेले हप्ते व बिले तात्काळ त्यांच्या खात्यावर अदा करण्यात यावीत, अशीही मागणी पांडुरंग शिंदे यांनी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी वानखेडे यांच्याकडे लावून धरली.

निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस किरण वाघमारे, व्यंकट अण्णा शिंदे, विश्नभर शिंदे, मधुकर शिंदे, गणेश वाघमारे, रोहिदास नव्हारे आणि काशिनाथ बाळापुरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button