राजकीय

संजय गांधी, श्रावणबाळ व दिव्यांग योजनांचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करा! :- मुखेड काँग्रेसची मागणी

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: ७ ऑगस्ट २६

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि दिव्यांग योजनांचे प्रलंबित असलेले प्रस्ताव प्रशासनाने तात्काळ मंजूर करून लाभार्थ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी मुखेड तालुका आणि शहरकाँग्रेस कमिटीच्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी आणि मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

सर्वसामान्यांना आणि गरजूंना आर्थिक आधार देणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या योजना आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून या योजनांचे अनेक प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहेत. यामुळे वृद्ध, निराधार आणि दिव्यांग नागरिकांना अनुदाना पासून वंचित राहावे लागत असून, त्यांना नाहक आर्थिक वमानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन प्रलंबित प्रस्तावांची लवकरात लवकर छाननी करावी आणि ते मंजूर करावेत, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने या निवेदनाद्वारे केली आहे.

हे निवेदन देते वेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. श्रावण रॅपणवाड, काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर, ओबीसी नेते विश्वनाथराव कोलमकर, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील आरगीळे, ओबीसी काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड, काँग्रेस शहर उपाध्यक्ष बालाजी वाडेकर, युवक काँग्रेस उपाध्यक्ष एम. आर. गोपणर आणि राजुभाऊ बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या रास्त मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी काँग्रेसच्यावतीने देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button