राजकीय

युवा शक्तीच्या जोरावरच ‘रासप’ राज्यात मोठी ताकद बनेल: युवा प्रदेशाध्यक्ष अजित पाटील

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड :- ०५ ऑगस्ट २६

  राष्ट्रीय समाज पक्ष नांदेड जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची रासपचे युवा प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकत्ते चोंडीकर यांच्या आयोजनात जिल्हा युवासंवाद बैठक दि. आगस्ट रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली.या बैठकीत राष्ट्रीय समाजपक्षाचे संघटन मजबुत करण्याचा एकमताने संकल्प करण्यात आला.

 या बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील जेष्ठ नेते पदाधिकारी,युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतेसदर बैठक राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांच्या अध्यक्षतेखालीतर जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकत्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.याप्रसंगी पक्षाचे जेष्ठ  युवानेते यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीत ओबीसी आरक्षण,युवा बेरोजगारी,शेतकरी प्रश्न आणिआगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष संघटना कशी मजबूत करायची यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी बोलताना युवा प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले नांदेड जिल्ह्यातील युवाकार्यकर्त्यांचा उत्साह पाहून समाधान वाटले.युवा शक्तीच्या जोरावरच रासप राज्यात मोठी ताकद बनेलजिल्हाध्यक्ष देवकत्ते यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात  पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीनेकाम करण्याचे आवाहन त्यांनी केले.राष्ट्रीय समाज पक्ष हा वंचित,शोषित आणि ओबीसी समाजाचा आवाज आहेत्यामुळे रासपचे प्रमुख महादेवजी जानकर,फादर बाॅडीचे प्रदेशाध्यक्ष,युवा प्रदेशाध्यक्ष जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावगावात पक्ष वाढवण्यासाठी प्रमाणीकपणे काम करु असे आश्वासन शिवकुमार देवकत्ते यांनी दिले.कार्यक्रमाच्या शेवटी नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा पुष्पहार आणि शाल घालून सत्कार करण्यात आला.या बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष,युवा मोर्चाचे पदाधिकारी,महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणी युवा कार्यकर्ते उपस्थितहोते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button