जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावे यासाठी मुखेड अभिवक्ता संघाचे तहसिलदारांना निवेदन!

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : ०८ ऑगस्ट २६
जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी दाखल केलेले अर्ज दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अधिवक्ता संघ, मुखेड यांच्या वतीने संबंधित प्रशासनाकडे निवेदन देऊन प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जन्म-मृत्यू प्रमाणपत्र हे नागरिकांच्या विविध शासकीय, शैक्षणिक, वारसाहक्क, बँकिंग तसेच न्यायालयीन कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मात्र, प्रमाणपत्रासाठी अर्ज करूनही दीर्घकाळ कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. परिणामी नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत नागरिकांना निर्धारित कालमर्यादेत सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने प्रलंबित अर्जांची तातडीने छाननी करून पात्र प्रकरणांमध्ये प्रमाणपत्रे वितरित करावीत, अशी मागणी अधिवक्ता संघाच्या वतीने करण्यात आली.
याबाबत अधिवक्ता संघ, मुखेड यांच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा न झाल्यास नागरिकांच्या हक्कासाठी पुढील कायदेशीर व लोकशाही मार्गाने वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
“नागरिकांना शासनाच्या सेवा वेळेत मिळणे हा त्यांचा अधिकार असून, अनावश्यक विलंब सहन केला जाणार नाही,” अशी भूमिका अधिवक्ता संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
यावेळ अभिवक्ता संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.दिगंबरराव मावलीकर,ॲड.गजानन शिंदे,ॲड. भाग्यश्री कासले, ॲड.राहुल मोरे,ॲड.माधव मरकंठवाड,ॲड.बाबाराव वाघमारे,ॲड.गजानन देवकत्ते,ॲड.योगेश सोलनकर, ॲड.एम.सी.गवलवाड,ॲड.एम.एस.खान,ॲड.शंकर बादावाड आदींची उपस्थिती होती.



