शेतकरी नेते राकेश टिकैत ५ ऑगस्टला नांदेडमध्ये; ‘भारत-अमेरिका व्यापारी करारावर’ करणार मार्गदर्शन

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड: ०४ ऑगस्ट २६
संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख राष्ट्रीय नेते. राकेश टिकैत हे ५ ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून, ते एका विशेष शेतकरी मेळाव्यात भारत–अमेरिका व्यापारी करारा बाबत (ट्रेड डील) मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळावा शहरातील शंकरराव चव्हाण सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
देशभरात सध्या ‘भारत–अमेरिका ट्रेड डील‘बाबत मोठी चर्चा सुरू असून, या कराराचे देशावर आणि विशेषतः शेती क्षेत्रावर काय परिणाम होतील, याविषयी जनजागृती करण्यासाठी राकेश टिकैत हे संपूर्ण देशभरात मोहीम राबवत आहेत. या मोहिमेचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये या विशेष शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह, नांदेड येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या व्यापारी करारातील क्लिष्ट अटी आणि त्याचे भविष्यातील परिणाम मा. राकेश टिकैत यांच्या सविस्तर आणि अभ्यासपूर्ण मांडणीतून समजून घेणे सोपे होणार आहे. देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या विषयावर होणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा तरी या महत्त्वपूर्ण शेतकरी मेळाव्याला नांदेड शहरातील सर्व सुजाण नागरिक, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन कॉ. विजय गाभने, कॉ. गंगाधर गायकवाड आणि कॉ. उज्वला पडलवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.



