आरोग्य

वैदिक साहित्य आणि पर्यावरण या विषयावर आँनलाईन व्याख्यान संपन्न

मुखेड प्रतिनिधी :-
येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय , नांदेडच्या संस्कृत विभागाच्या वतीने 28 फेब्रुवारी विज्ञान दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . याप्रसंगी प्रा.डॉ. आनंद अष्टुरकर यांनी भारतीय साहित्य जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता असणारे साहित्य आहे . वैदिक साहित्य हे प्राचीन काळापासून लोकमंगलाची भूमिका घेतली आहे . ” वसुदेव कुटुंबकम ” ची संकल्पना या साहित्याने मांडली आहे . या साहित्यातून पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी मोलाचे सहकार्य लाभणार आहे . यामध्ये शाश्वत विकासाकरिता पर्यावरण समतोल राखण्यासाठी देखील मदत होते असे विचार प्रतिपादित केले .
या ऑनलाईन व्याख्यानाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. अडकिणे , व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते
नांदेडच्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रा.डॉ. आनंद अष्टुरकर आणि विशेष अतिथी म्हणून नेसुबो महाविद्यालयाचे उपप्राचार्या डॉ. कल्पना कदम हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विभाग प्रमुख प्रा.डॉ. गणंजय कहाळेकर , सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.चंद्रकांत एकलारे तर आभार प्रदर्शन नेसुबोमचे संस्कृत विभाग प्रमुख प्रा.डॉ. शशिकांत दरगु यांनी केले .
मान्यवरांचे शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करण्यात आले . ” वैदिक साहित्य आणि पर्यावरण ” या विषयावर मार्गदर्शन प्रसंगी प्रा.डॉ. अष्टुरकर यांनी वेद , उपनिषेद , ब्राह्मण ग्रंथ , अरण्यक , सूत्र , वेदांग इत्यादी वैदिक साहित्यामध्ये पर्यावरण संबंधी विचाराची मांडणी केली . पर्यावरण शिक्षण काळाची गरज आहे . शासन , प्रशासन व न्यायालय या सर्वांचा अट्टाहास पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आहे . संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या या समस्येवर भारतीय प्राचीन साहित्यामध्ये उपाय सुचविण्यात आले आहे . जैव विविधता , सण , वार , उत्सवाची प्रदीर्घ परंपरा आहे . वायु , जल ,ध्वनी प्रदूषण , जंगलतोड रोखण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात . मृदा संवर्धन व सुरक्षेवर सुद्धा प्रकाश टाकताना वैदिक साहित्याची मौलिकता सांगितले .
अध्यक्षीय समारोपाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. अडकिणे यांनी मानव आणि निसर्ग यांच्यातील असणारे अनुबंध विषद करताना पर्यावरण टिकेल तरच माणूस टिकणार आहे . अन्यथा आपल्या अधोगतीला आपणच कारणीभूत ठरणार आहोत . अनावश्यक पर्यावरणात हस्तक्षेपामुळे हजारों संकट उभे राहिले आहेत . औद्योगिकीकरण , जागतिकीकरणातील अनेक चुकीच्या स्पर्धेत पर्यावरण हानी होते आहे . हा प्रकार वेळीच रोखणे आवश्यक आहे असे विचार व्यक्त केले . यावेळी बहुसंख्येने प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी , विद्यार्थिनी , संशोधक , अभ्यासू मंडळींची उपस्थिती होती .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button