बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; 2 ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयातशिरण्याचा इशारा

▫️फडणवीसांनी एक दिवसाचा उपवास करावा – नयना कडू
▫️बावनकुळेंचे उपोषण मागे घेण्याचे आवाहन धुडकावले
अमरावती:-
शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत ७ दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी २ ऑक्टोबरप र्यंतची मुदत नाही तर २ ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत.
शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत ७ दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडूयांनी आता परवापासून म्हणजे १६ तारखेपासून जलत्याग करण्याचा इशारा दिला आहे. सरकारने कर्जमाफीच्या मुद्यावर वेळीच निर्णय घेण्याची गरज होती. आता या प्रकरणी सरकार एक समिती नेमणार आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती आहे. पण सरकारने आज निर्णय घेतला नाही तर मी १६ जूनपासून जलत्याग उपोषण करेल, असे ते म्हणालेत.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू गत ७ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविद मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करत आहेत. या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून, डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. पण त्यानंतरही बच्चू कडू यांनी आपले उपोषण नेटानेपुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. ते शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, खरे तर लवकरनिर्णय व्हायला हवा होता. सरकारने आता यासंबंधी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतलाआहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे.
पण या समितीची अहवाल केव्हा येणार? कोणत्या तारखेला कर्जमाफीची घोषणा करणार? हे काहीहीस्पष्ट नाही. या मुद्यावर मी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. या बैठकीत एखादा निर्णय होईपर्यंत कार्यकर्त्यांनी संयम राखावा. कोणतेही अनुचित कृत्य करू नये. पण माझी मानसिकता आहे की, १६ तारखेपासून पाणीही सोडून द्यावे, असे बच्चू कडू म्हणालेत.



