तेलंगाना काँग्रेसच्या विजयात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा:- डॉ. श्रावण रॅपनवाड

मुखेड प्रतिनिधी..
तेलंगाना विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशात महाराष्ट्र काँग्रेस नेते व पक्षाचा मोलाचा वाटा आहे असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेश सचिव तथा वारंगल लोकसभा क्षेत्रातील परकाल विधानसभा मतदारसंघाचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे निरीक्षक डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी केले आहे.
तेलंगाना विधानसभा निवडणुकीत दीड महिना कार्य करून निवडणूक निकालानंतर मुखेडला परतलेले ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे निरीक्षक डॉ. श्रावण रॅपनवाड पत्रकारांशी बोलत होते. तेलंगाना विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब हे राज्याचे विशेष निरीक्षक तर तेलंगणा राज्याचे प्रभारी म्हणून माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटी कडून निरीक्षक नेमून त्या ठिकाणी पक्षाची पूर्ण यंत्रणा राबवली. यात लोकसभा निहाय निरीक्षक रवींद्र दळवी आदींनी ४-४ महिने आणि माझ्यासारखे विधानसभा निरीक्षक असतील यांनी दीड महिना तळ ठोकून प्रचार यंत्रणा सक्षमपणे राबवून लहर तयार केली. अगदी सूक्ष्म नियोजनात प्रत्येक मतदारसंघ वार रूम तयार करून मुख्य वार रूम सोबत संपर्कात राहून पक्षाचा प्रत्येक उपक्रम प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचविले. सहा गॅरंटी कार्ड आणि सोनियाजींचे भावनिक पत्र खूप साहाय्यभूत ठरले. महाराष्ट्र सीमावर्ती भागात अशोकराव चव्हाण यांच्या सूक्ष्म नियोजनात काँग्रेस पक्षाने चांगले घवघवीत यश मिळवलेले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला तेलंगानात मिळालेल्या यशात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,माजी मंत्री तथा तेलंगाना प्रभारी माणिकराव ठाकरे, रवींद्र दळवी आदींसारखे लोकसभा निरीक्षक यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे महाराष्ट्र काँग्रेस नेते व पक्षाच्या विविध निरीक्षकामुळे महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे असे प्रतिपादन तेलंगाना निवडणुकीतील ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तथा मुखेडचे भूमिपुत्र डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी केले आहे. तेलंगणातील वारंगल लोकसभा क्षेत्रातील पारकाल विधानसभा मतदारसंघात सातत्याने काँग्रेस उमेदवार मोठ्या फरकाने हारत होते,यावेळी तेथे काँग्रेसला विजयी करण्याचा आणि लोकसभा क्षेत्रात ७ पैकी ६ आमदार काँगेस ने जिंकल्याचा आनंद फार मोठा असल्याचे रॅपनवाड यांनी यावेळी सांगितले.


