सांगोला तालुक्यात हुकूमशाही, दादागिरी, गुंडगिरी, भाईगिरी अजिबात चालू देणार नाही: आ.बाबासाहेबदेशमुख

माझ्यासहित सर्व कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची वाढली जबाबदारी
सांगोला :- सांगोला तालुक्यात हुकूमशाही, दादागिरी, गुंडगिरी, भाई गिरी अजिबात चालू देणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊनच ५५ वर्षाच्या परंपरेनुसार सांगोला मतदारसंघाचा कारभार करू. कोणाचीही अडवणूक अथवा वेठीस धरण्याचे प्रकार आता चालणार नाहीत. सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्याकोणाचीही गय केली जाणार नाही असा खणखणीत इशारा नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीयावेळी दिला. तुमचा पाठिंबा आणि विश्वास हीच माझी ताकद आहे. जनतेच्या भल्यासाठी काम करणे हेचमाझे ध्येय असून, भविष्यातही मी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहीन. आपले प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्याअसे आवाहन करत विधानसभा निवडणुकीतील यशाने आम्ही हुरळून जाणार नाही, तालुक्यात या पुढे हुकूमशाही, दादागिरी, गुंडगिरी, भाई गिरी अजिबात चालू देणार नाही असा इशारा आम बाबासाहेब देशमुखयांनी दिला आहे.
डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत म ोठ्या मताधिक्यानेविजय मि ळवला होता. निवडणुकीनंतर जेवढे मताधिक्य तेवढे वृक्षारोपण लावण्याचा त्यांनी संकल्प केलाअसून शनिवारी मुंबईहून त्यांचे सांगोला येथे आगमन झाले. यावेळी सर्वसाम ान्य नागरिकानी त्यांच्यास्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्त्यांनी हार तुरे ऐवजी रोपे देऊन डॉक्टरबाबासाहेब देशमुख यांचे अभिनंदन करत आहे. यावेळी ते बोलत होते. आगामी काळात सर्वसामान्यनागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेन अशी ग्वाही उपस्थितांना दिली.
आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की, सांगोल्याच्या सर्वसामान्य जनतेसमोर मी नतमस्तक होतअसून हा विजय आमची जबाबदारी वाढवणारा आहे. स्वर्गीय भाई गणपतराव देशम ख यांच्याप्रमाणेमाझ्यावर सांगोल्यातील सर्वसामान्य जनतेने मोठा विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे आम्हाला मतदारसंघात खूप काम करावे लागेल, याची जाणीव होत आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडाजाऊ देणार नाही तालुक्याच्या प्रथम नागरिक म्हणून आता जबाबदारी वाढली आहे. विधानसभानिवडणुकीतील यशाने आम्ही हुरळून जाणार नाही. सर्वच गावांमध्ये शेतकरी कामगार पक्षाला चांगले यशमिळाले आहे. माझ्यासहित सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून आम्हाला इथून पुढेअधिक बारकाईने काम करावे लागेल. आम्ही जनतेच्या ऋणात राहू इच्छितो. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊदिला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले



