मराठा आरक्षणाची लढाई आता मुंबईत….

▫️आरक्षणा शिवाय घरी परतणार नाही असंख्य युवकांनी केली भावना व्यक्त
मुखेड प्रतिनिधी:- २६ ऑगस्ट
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभर तीव्र चळवळ उभारणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हाएकदा आक्रमक झाले असून आता त्यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवार पासून (दि. २८ ऑगस्ट) मराठा समाजाचा विराट मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे .
दि. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या या भव्य आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुखेड तालुक्यातील हजारो मराठा युवक मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळते आहे.
गावागावांतून सकल मराठा समाजाने मोर्चासाठी जोरदार तयारी केली आहे. चावडी वाचन, गाव बैठका, मशाल रॅली, कीर्तन, भजन आदी सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जातअसून, प्रत्येक मराठा बांधवांना आरक्षणासाठी मुंबई गाठण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर मुखेड परिसरात मोठी चळवळ उभी राहिली आहे.सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावेळी मुखेड शहरासह तालुक्यातील जवळपास सर्व गावांतून मोठ्या संख्येने तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिक मुंबईकडे रवाना होणार आहेत. पूर्वीच्या आंदोलना पेक्षा या वेळी दहा पटींनी जास्त उपस्थिती दाखवली जाईल, असा विश्वास व्यक्तकरण्यात आला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा समाजाचा संयमसुटू शकतो, असा इशारा सकल मराठा समाजातील नेत्यांनी दिला आहे. “मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने सातत्याने आवाज उठवला, मात्र अद्यापही योग्य न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आता लढानिर्णायक टप्प्यात गेला असून, आरक्षणा शिवाय घरी परतणार नाही,” अशा भावना समाजातीलयुवक–युवती व्यक्त करत आहेत.
मुखेड तालुक्यातील विविध संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला असून, सर्वांनी एकदिलाने आंदोलनयशस्वी करण्याचे ठरवले आहे. मराठा समाजाची ऐक्यबांधणी, उत्साह आणि प्रबळ जनसमर्थन पाहताआगामी मोर्चा ऐतिहासिक ठरणार, आहे, असे सकल मराठा समाज मुखेड तालुक्याच्या वतीने व्यक्तकरण्यात आले



