बेरळी बुद्रुकचे चेअरमन रामराव पाटील इंगोले यांचे निधन !

मुखेड प्रतिनिधी:-
बेरळी बुद्रुक सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा वारकरी संप्रदायाचे जेष्ठ वारकरी रामराव सिताराम पाटील इंगोले वय ९५ वर्ष यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.
स्वर्गीय रामराव पाटील इंगोले हे बेरळी येथील ज्येष्ठ नागरिक तथा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ वारकरी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. बेरळी बुद्रुक येथील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणूनही त्यांनी कार्य केले. आज दुपारी त्यांचे वर्धापकाळाने दुःखद निधन झाले.
उद्या १० नोव्हेंबर रोज शुक्रवार दुपारी एक वाजता बेरळी बुद्रुक येथे स्वर्गीय रामराव पाटील इंगोले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्वर्गीय रामराव पाटील इंगोले यांच्या पश्चात किशनराव इंगोले, आनंदराव इंगोले असे दोन मुले, सुना,६ मुली नातू – नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रेशन विभाग मुंबईचे उपायुक्त श्री मधुकरराव शेषराव बोडके पाटील यांचे ते आजोबा होत.



