सामाजिक

मुखेडची जनता वाऱ्यावर; सत्ताधारी नगरसेवकांची ‘देव दर्शन’ टूर मस्त सुरू!

मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ १० जून २६ 

शहरात नागरी समस्यांचा डोंगर साचलेला असताना आणि नागरिक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करतअसताना, सत्ताधारी नगरसेवक मात्र ‘देव दर्शना‘च्या सहलीत मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून लोकप्रतिनिधींनी सहलीचा आनंद लुटणे, हा मुखेडकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

अनेक प्रभागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

शहरातील कचरा उठाव वेळेवर होत नसल्याने ठिकठिकाणी दुर्गंधी पसरली आहे, ज्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पावसाळा तोंडावर आला तरी प्रभागातील नाल्या व रस्त्यांवरील खड्डे अजूनही बुजवले गेलेले नाहीत.

निवडणुकीच्या वेळी ‘सेवा करू‘ म्हणणारे प्रतिनिधी आता कठीण काळात जनतेला सोडून पर्यटन करत आहेत. जनतेच्या प्रश्नांपेक्षा त्यांना देव दर्शन महत्त्वाचे वाटू लागले आहे का?” असा सवाल सामान्यनागरिक विचारत आहेत.

एकीकडे सामान्य माणूस प्रशासकीय कामांसाठी नगरपालिकेत चकरा मारत आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींची ही ‘टूर‘ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. जर समस्या वेळेत सुटल्या नाहीत, तर आगामी काळात जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी ठेवावी, असा इशाराही आतादिला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button