सामाजिक

मुखेड तालुक्यात अवकाळीचा तडाखा; रब्बी पिके आडवी, बळीराजा संकटात

मुखेड (प्रतिनिधी): २४ फेब्रुवारी २६

तालुक्यात सोमवारी (दि२३दुपारी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले आहेया नैसर्गिक आपत्तीमुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असतानाचसोमवारी दुपारी  वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झालाढगांच्या गडगडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावलीसुमारे पाऊण ते एक तास चाललेल्या या पावसामुळे शेतात पाणी साचले असून काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

तालुक्यात सध्या ज्वारीगहूहरभरा आ ,आणि करडई ही पिके अंतिम टप्प्यात आहेतअनेक ठिकाणीज्वारी काढणीला आली होतीतर गहू दाणे भरण्याच्या अवस्थेत होतामात्रवादळी वाऱ्यामुळे उभी पिके जमिनीला लागली आहेतपावसामुळे हरभऱ्यालाही फटका बसला असून पिकांचा दर्जा घसरण्याची भीतीव्यक्त होत आहे.

वादळी वाऱ्यामुळे केवळ पिकांचेच नव्हेतर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाल्याच्या आणि झाडेपडल्याच्या घटनाही घडल्या आहेतया अचानक आलेल्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहेकृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडूनमदत जाहीर करावीअशी मागणी मुखेड तालुक्यातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button