क्राईम

मुखेड वनविभाग ‘कोमात’, लाकूड तस्कर ‘जोमात’; अवैध वृक्षतोडीने पर्यावरणाचे मोठे नुकसान

मुखेड प्रतिनिधी: २४ फेब्रुवारी २६

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एकीकडे वृक्षारोपणाचे कोट्यवधींचे टार्गेट दिले जातेतर दुसरीकडे मुखेड तालुक्यामध्ये वनविभागाच्या नाकाखाली वनसंपदेची दिवसाढवळ्या कत्तल सुरू आहेमुखेड तालुक्यातील बारहाळी , मुक्रमाबादजाहुरराजूराआंबुलगा , ईडग्याल ही गावे कर्नाटक  तेलंगणा राज्याच्या अगदी जवळ असल्यामुळे या भागातून दररोज सुमारे ५० हून अधिक  ट्रॅक्टर आणि ट्रक लाकूड भरून राज्यात  परराज्यात लाकूड अवैध मार्गाने विकले जात आहे . विशेष म्हणजेयासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही वनविभाग ढिम्म असल्याने “वनविभाग कोमात आणि तस्कर जोमात” अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

मुक्रमाबाद , बाऱ्हाळी , जाहूर , राजूराआंबुलगा , ईडग्याल अवैधरीत्या तोड करून ती लाकडे मोठ्यावाहनांतून वाहून नेली जात आहेत. (सोबतच्या छायाचित्रात दिसत असल्याप्रमाणेलाकडांनी भरलेली हीवाहने मुख्य रस्त्यावरून बिनदिक्कतपणे जात असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहेया तस्करांना कोणाचे अभय लाभले आहेअसा सवालआता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

हवे तसे परवाने? : एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाकूड वाहतूक होत असताना वनविभागाकडे याचे रीतसरपरवाने आहेत काकी केवळ अर्थपूर्ण तडजोडीतून हा ‘हिरवा‘ बाजार सुरू आहे?

यापूर्वी देखील या विषयावर बातम्या प्रसिद्ध झाल्यामात्र अधिकार्‍यांच्या कातडीवर याचे कोणतेहीओरखडे उमटले नाहीत.

बेसुमार वृक्षतोडीमुळे या भागातील पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असूनभविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

जर ही अवैध वृक्षतोड आणि वाहतूक त्वरित थांबली नाहीतर वनविभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक पर्यावरण प्रेमींनी दिला आहेआता तरी वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन संबंधित कर्मचाऱ्यांवरलाकूड तस्करी करणाऱ्यावर कारवाई करणार काहे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button