सामाजिक

हिमायतनगर नगरपंचायतीचा ‘स्वच्छता’ नावाचा फार्स! नालीतील कचरा ४ दिवसांपासून रस्त्यावरच सडतोय; अर्धा कचरा पुन्हा नालीत!

हिमायतनगर प्रतिनिधी:- अजीम हिंदुस्तानी ०३ जून २६

शहरातील वार्ड क्रमांक  मध्ये नगरपंचायतीच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराचा उत्तम नमुना पाहायला मिळत आहेया वार्डात नाली स्वच्छतेचे काम तर करण्यात आलेमात्र नालीतून बाहेर काढलेला प्लास्टिक कचरा आणि दुर्गंधीयुक्त गाळ गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या कडेला तसाचपडून आहेकचरा वेळीच  उचलल्या गेल्यामुळे वाऱ्याने आणि वाहनांच्या वर्दळीमुळे त्यातील अर्ध्याहून अधिक प्लास्टिक कचरा पुन्हा नालीत गेला आहेत्यामुळे प्रशासनाचा हा नेमका कसला स्वच्छता ‘फार्स‘ सुरू आहेअसा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

नियम कडक असतानाही नाली साफ केल्यानंतर तो कचरा त्वरित उचलणे अपेक्षित होतेमात्रप्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा कचरा अनेक दिवस रस्त्यावरच सडत राहिलाआज बाजाराचा दिवस असल्याने शहरात मोठी गर्दी होतीतरीही रस्त्यालगत पडून असलेला गाळ  प्लास्टिक कचरा हटविण्याचे सौजन्य प्रशासनाने दाखवले नाहीयामुळे व्यापारीपादचारी आणि ग्राहकांना प्रचंड गैरसोयीचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागला.

सध्या पावसाळा तोंडावर आला आहेअशा परिस्थितीत नाल्या पूर्णपणे मोकळ्या करणे गरजेचे असतानाकाढलेला कचरा पुन्हा नालीत जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहेपहिल्याच पावसात नाल्या तुंबून पाणी रस्त्यावर आणि दुकानांत शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “जर नालीतील कचरा बाहेर काढून तो पुन्हा नालीतच जाणार असेलतर अशा दिखाऊ स्वच्छता मोहिमेचा फायदा काय?” असा रोखठोक प्रश्न स्थानिक जनतेने उपस्थित केला आहे.

प्रशासनाने केवळ साफसफाईचे फोटो काढून गाजावाजा करण्यापेक्षा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यावर भर द्यावावार्ड क्रमांक  मधील रस्त्यावर पडून असलेला उर्वरित गाळ  प्लास्टिक कचरा आजच्या आजतात्काळ हटवून परिसर स्वच्छ करावातसेचभविष्यात नाली स्वच्छतेनंतर लगेचच कचरा उचलणारीयंत्रणा कार्यान्वित करावीअशी तीव्र मागणी हिमायतनगरमधील सुज्ञ नागरिकांनी  व्यापाऱ्यांनी केलीआहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button