सामाजिक

अवैध धंदेवाल्यांचा कर्दनकाळ ठरलेले डीआयजी शहाजी उमाप यांची मोठी कारवाई; परभणी एलसीबीसह ८ अमलदारांवर गाजली कुऱ्हाड!

नांदेड प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़ २० जून २६

नांदेड परिक्षेत्रातील नांदेडलातूरपरभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये अवैध व्यवसायां विरोधात कठोर भूमिका घेतकर्तव्यदक्ष पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजीशहाजी उमापयांनी एक मोठी प्रशासकीय कारवाई केली आहेया धडक मोहिमेमुळे संपूर्ण पोलीस दलात प्रचंडखळबळ उडाली आहेअवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाहीअसा  स्पष्ट संदेश या कारवाईतून डीआयजी उमाप यांनी दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसारनांदेड परिक्षेत्रात वाळू तस्करीमटकाजुगारगुटखा विक्रीअवैध दारू व्यवसाय यांसारखे बेकायदेशीर धंदे जोमाने सुरू होतेया बेकायदेशीर धंद्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या(एलसीबीकाही अधिकाऱ्यांचे  अमलदारांचे जाहीर संरक्षण लाभत असल्याचा गंभीर आरोप तक्रारीं मध्ये करण्यात आला होता.

डीआयजी शहाजी उमाप यांच्या या धडक मोहिमेत परभणी एलसीबीचे (स्थानिक गुन्हे शाखापोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांची थेट नांदेड नियंत्रण कक्षात संलग्नता (बदलीकरण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षकां सोबतच एलसीबी मधील इतर ८ पोलीस अमलदारांना तात्काळ परभणी येथील पोलीस मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहेया अचानक झालेल्या कारवाईमुळे पोलीस विभागातील भ्रष्ट आणि सुस्त अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असूनसंबंधित अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची आणि आरोपांची सखोल चौकशी करण्याची जबाबदारी नांदेडच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

डीआयजींच्या या आक्रमक मोहिमे मुळे नांदेडलातूरपरभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील अवैध वाळू उत्खननगुटखा तस्करी आणि मटकाजुगार अड्ड्यांवर मोठे हादरे बसले आहेतपरभणी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांविरुद्ध आणखी कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

अवैध धंद्यांचे मूळ मोडीत काढण्यासाठी पोलीस दलाने उचललेल्या या धाडसी पावलाचे सर्वसामान्य नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात स्वागत होत असूनजनतेतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध‘ असल्याचा विश्वास या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button