खरेदी-विक्री संघाच्या ७ जागांसाठी २३ सप्टेंबरला रणधुमाळी; त्याच दिवशी निकाल

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क:- २१ सप्टेंबर २६
मुखेड तालुका सहकारी खरेदी–विक्री संघ मर्यादितच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडणार आहे. नवा मोंढा येथील संस्थेच्या कार्यालयात सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया चालणार असून, मतदानानंतर लगेचच त्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीत एकूण ७ जागांसाठी मतदान होत असून, यात वैयक्तिक मतदारसंघ (२ जागा), महिला प्रतिनिधी (२ जागा), अनुसूचित जाती–जमाती (१ जागा), इतर मागासवर्गीय (१ जागा) आणि विमुक्तजाती–भटक्या जमाती (१ जागा) या प्रवर्गांचा समावेश आहे.
या निवडणुकीसाठी वैयक्तिक मतदार संघातील १४६ आणि संबंधित सहकारी संस्था मतदारसंघातील ९५मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठीचोख पोलीस बंदोबस्त आणि सहकार विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकारी अनिल चव्हाण यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक संपन्न होत आहे.



