सामाजिक

दिवाळीत खाजगी ट्रॅव्हल्सची मनमानी चालणार नाही; जादा भाडे आकारल्यास थेट तक्रार करण्याचे प्रशासनाचे आवाहन

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क नांदेड: ३० ऑक्टोंबर २६

दिवाळी सण आणि सुट्ट्यांच्या काळात होणारी प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन, खाजगी ट्रॅव्हल्सकडूनहोणारी नागरिकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी नांदेड प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. निर्धारित भाड्यापेक्षा जास्त रक्कम आकारणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सविरुद्ध प्रवाशांनी थेट तक्रार नोंदवावी, असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

भाडेवाढीचे नियम काय आहेत? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसनासणासुदीच्या काळात शासनाच्या तरतुदीनुसार नियमित भाड्याच्या दीडपट (१.५ पट) भाडे आकारण्याचीपरवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोणत्याही खाजगी ट्रॅव्हल्सला या दरापेक्षा जास्त किंवा मनमानीपद्धतीने भाडे आकारण्याचा कोणताही अधिकार नाही.

खाजगी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारण्यात आल्यास प्रवाशांनी खालील माहिती व पुराव्यांसहतात्काळ प्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार नोंदवावी संबंधित ट्रॅव्हल्सचे नाव, बस क्रमांक, प्रवासाचामार्ग आणि प्रवासाची तारीख याची सविस्तर नोंद ठेवावी. जादा भाडे आकारल्याचा मुख्य पुरावा म्हणूनप्रवाशांनी आपले प्रवासाचे तिकीट आणि भाडे भरल्याची पावती आवर्जून जतन करावी आणितक्रारीसोबत सादर करावी.

दिवाळीच्या काळात खाजगी ट्रॅव्हल्सने एसटी बसच्या दीडपट भाड्यापेक्षा जास्त व मनमानी भाडेआकारल्यास त्यांच्याविरुद्ध थेट तक्रार करण्याचे आवाहन नांदेड प्रशासनाने केले आहे. प्रवाशांनी जादाभाडे आकारल्याचा पुरावा म्हणून प्रवासाचे तिकीट, पावती, ट्रॅव्हल्सचे नाव आणि बस क्रमांकाची नोंदठेवून प्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार करावी. प्रवाशांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी प्रशासनानेतक्रार नोंदवण्यासाठी rto.26-mh@gov.in हा ई–मेल आणि ०२४६२–२५९१०० हा संपर्क क्रमांक जारीकेला आहे.

प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी व तिकीट घेताना आकारण्यात येणाऱ्या भाड्याची खात्री करूनच तिकीटखरेदी करावे, असेही या आवाहनात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button