शहरसामाजिक

मुखेड नगर परिषदेचा निष्काळजीपणा: रस्त्यावरील मोकळे ‘शिरकोट’ बनले मृत्यूचा सापळा!

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : ३० सप्टेंबर २६

गणपती मिरवणुकीच्या निमित्ताने शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश कागदावर निघाले खरे, मात्र मुखेड नगर परिषदेने प्रत्यक्षात कामाची केवळ थातुरमातुर बोळवण केल्याचे उघड झाले आहे.

 काही मोजक्या ठिकाणी सिमेंट टाकून खड्डे बुजवण्यात आले, तर बहुतांश रस्त्यांवर डांबरा शिवाय मोकळे‘शिरकोट‘ (बारीक खडी) पसरवून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. रोलर न फिरवता टाकलेली हीखडी आता थेट अपघातांना निमंत्रण देत असून, विद्यार्थ्यांसह वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहे.

या रस्त्यांवरून शाळा आणि क्लासेससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सायकली व दुचाकी घसरून दररोज अपघात होत आहेत. अनेक शाळकरी मुले या शिरकोट वरून पडून जखमी होत आहेत. शहरातील शनिदेव मंदिर मुख्य रस्ता, गोरक्षण रस्ता, मुगावे यांच्या घराच्या बाजूचा रस्ता तसेच माजी नगराध्यक्ष कामजे यांच्या घराशेजारील फॉरेस्टकडे जाणारा रस्ता अशा प्रमुख आणि अनेक वर्दळीच्या मार्गांवर हीच धोकादायक स्थिती आहे. पालिका प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे भविष्यात एखादी मोठी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल विचारत मुखेडकरांमधून तीव्र आक्रोश व्यक्त होत आहे. प्रशासनाने हे पसरलेले शिरकोट तातडीने हटवून रस्त्यांची पक्की दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button