Sharmik Ekta

  • क्राईम

    परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवण्यासाठी पैसे मागितले

    एसएफआय ने आरोप करीत कारवाईची मागणी केली मुखेड/प्रतिनिधी मुखेड उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (एच.एस.सी) बैठी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर परीक्षा…

    Read More »
  • सामाजिक

    ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोनापुरे यांना शेळी, मेंढी विकास महामंडळावर घेण्याची मागणी

    मुखेड/प्रतिनिधी:- भटक्या व विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पु. अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी मुखेड येथील ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोनापूरे यांची नियुक्ती करावी अशी मागणी माजी जि.प. सदस्य सुर्याजी पाटील चाडकर, पं. स. सदस्य शकरराव काळे, अॅड. मुरलीधरराव डाके, गंगाधर पाटील नारे, दिगांबर पिंपळे, माधवराव श्रीरामे आदी धनगर समाजाच्या नेत्यांनी माजी खा.डॉ. विकास महात्मे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. धनगर व भटक्या प्रवर्गातील समाजबांधवांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी शासनाने पुणे येथे पु. अहिल्यादेवीहोळकर शेळी व मेढी विकास महामंडळाची स्थापना केली आहे. महामंडळाचा सर्वसामान्यांना लाभ मिळवूनदेण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघ संस्कारात वाढलेले, परिवारातील अनेक जबाबदाऱ्या निभावलेलेनिष्ठावंत कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोनापूरे यांची नियुक्ती करुन सामान्य कार्यकर्त्याला न्यायद्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्याजी पाटील चाडकर सरपंच चारवाडी,गंगाधर पाटील नारेडोंगरगांव, माजी पं. स. सदस्य शंकरराव काळे बिलोली, एडवोकेट मुरलीधरराव डाके हादगाव, एड.प्रशांतकोकणे, शिवाजी पाटील हंगरगेकर, शेळगावचे सरपंच संजय पाटील चोंडे, हाणमंतराव मावले उपसरपंचचारवाडी, माधवराव श्रीरामे,माधव पाटील घोणसे, नारनाळीचे सरपंच भुजंगराव देव्हारे, युवा उद्योजक गणेशबिरु, विलास गावंडे माहूर, दिगांबर पिंपळे मरवाळीकर, चिवळीचे सरपंच संदिप पाटील जायनूरे, दिगांबरमाने सर, गोपाळराव म्हेत्रे सर, साहेबराव पाटील नारे, शिवशंकर पाटील देवकत्ते, बालाजी पाटील नारे सर, माजी सरपंच हणमंतराव वनाळे पाटील, प्रदेशाध्यक्ष आनंद बनसोडे परभणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

    Read More »
  • आरोग्य

    जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूल मध्ये राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस साजरा

    श्रीरामे डेंटल हॉस्पिटलच्या वतीने २८६ विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्याची मोफत तपासणी मुखेड / प्रतिनिधी:-    राष्ट्रीय दंत चिकित्सक दिन व जागतिक महिला दिना निमित्य मुखेड येथिल श्रीरामे डेंटल हॉस्पिटलच्या वतिने वैद्यकीय संस्थेचे माजी सचिव दंतरोगतज्ञ डॉ.पांडुरंग श्रिरामे,डॉ.जावेद शेख यांनी मुखेड शहरातील पिएमश्री, आदर्श शाळा,जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूल मधिल २८६ विद्यार्थ्यांना दंत व मुख आरोग्याच्या संदर्भात मार्गदर्शन करुन सर्वांची दंततपासणी करण्यात आली.याप्रसंगी प्रशालेच्या वतीने डॉ .श्रीरामे व डॉ .शेख यांचा सत्कार करण्यात आले. लहान मुलांच्या दातांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यांचे दात नाजूक असतात आणि भविष्यात दातांच्या आरोग्यावर त्याचा प्रभाव पडतो. यामुळे लहान वयात त्यांच्या दातांची योग्य काळजी घेतल्यास पुढील काळात चांगले दंत आरोग्य टिकवता येते असे प्रतिपादन दंतरोगतज्ज्ञ डॉ. पांडुरंग श्रीरामे यांनी मुखेड येथील जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूल मुखेड येथे केले.   …

    Read More »
  • सामाजिक

    मानसिकता बदलविण्यासाठी महिलांनीच महिलांची साथ देणे आवश्यक : मिनल करनवाल

     •  बालिका पंचायत 2.0 चा जिल्ह्यात शानदार शुभारंभ  नांदेड दि. 8 मार्च :- महिलांचे स्वतंत्र अस्तित्व घराघरातून निर्माण करण्यासाठी बालिका…

    Read More »
  • शैक्षणिक

    जिल्हाधिकाऱ्यांची परीक्षा केंद्रांना भेट;केंद्रसंचालक व कर्मचारी निलंबीत   

    · परीक्षा केंद्रावर अनावश्यक गर्दी · पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश  नांदेड दि. 7 मार्च : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज…

    Read More »
  • आरोग्य

    यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा चे सुयश.

    अचानक हाताला व पायाला लकव्याच्या २२ वर्षीय युवतीवर यशस्वी उपचार न्युरोलॉजिस्ट डॉ. मोहन कृष्णा यांच्या प्रयत्नांना यश ः .जिबीएस –…

    Read More »
  • आरोग्य

    पशुपालक बांधवांनो जखमी,वृद्ध गायांचे अवहेलना करू नका -डॉ.राहुल कांबळे 

    मुखेड प्रतिनिधी:-  जिल्ह्यातील पशुपालक बांधवांनी आपल्या मुक्या प्राण्यांची अवहेलना करू नका आपल्या कडे चांगले असे पर्यंत आपण त्या गाईची दूध खातो त्यांचे गोरे सांभाळून विक्री करतो त्यावर आपलं घर चालवतो आपलाआधार निर्वाह होतो आपला संसार व्यवस्थित होतो जेव्हा गाय वयोवृद्ध झाली की गोरक्षण मध्ये आपणआणून सोडतो भाकड गाई पाय मोडलेल्या गाई जी दूध देत नाही तिची खूप अवहेलना करून गोरक्षण मध्येआपण आणून देत आहात हे अत्यंत चुकीचा आहे आई–वडील म्हातारे झाले की वृद्ध आश्रमामध्ये पाठवतआहात आणि गाई पण म्हाताऱ्या झाल्या की गोरक्षण संस्थेमध्ये पाठवत आहात ही माणुसकी नाही आहेमाणुसकीला शोभणारी ही गोष्ट नाहीये आपणाला गाई बद्दल जर प्रेम असेल तर त्या गाईचं पालन पोषणव्यवस्थित करा वयोवृद्ध झाल्यानंतर पण तिला पालनपोषण करा रस्त्यावर आपल्या सोडू नका गायीचीअलवेदना करू नका आता ती राष्ट्रीय माता आहे याची जाणव पशुपालकांना असणं गरजेचं आहे असंडॉ.राहुल कांबळे म्हणाले  आज एका गाईला खूप अत्यंत त्रास होता तिचा पाय मोडला होता पण त्या पाय मोडलेल्या ठिकाणी हाडाचेफणसे मधेच होते त्यामुळे हाड झुटत नव्हते एका पशुपालकाने ही गाय गोरक्षण संस्था मुखेड मध्ये आणूनसोडली तिच्या या त्रासामुळे चारा खात नव्हती बेचैन होती तळमळ करत होती तिच्या पायामध्ये खूप आयापडल्या होत्या खूप मोठी जखम झाली होती त्यामुळे आज त्या गाईच्या पायाच्या शस्त्रक्रिया करून तिच्यावेदना कमी केल्या जखमी मध्ये पडलेल्या आळ्या पूर्ण काढल्या आणि मोडलेल्या पायाती हाडाचे फणसेकाढून टाकले तिचे प्लास्टर केले या गाईच्या वेदना जाणून घेऊण डॉ.राहुल कांबळे यांनी अत्यंत प्रयत्न करुनगाईवर विलाज यशस्वी झाला त्या गाईला  जीवदान मिळाले अत्यंत त्रास त्या गाईला होता ते त्रास कमीडॉ.कांबळे हे यशस्वी झाले हि गाय आता उभा टाकली आहे चारा खाते व्यवस्थित आहे गाई बद्दलची आस्थाअसली पाहिजे गाई बद्दलची अवहेलना नको आहे याप्रसंगी डॉ.राहुल कांबळे यांनी पशुपालकांना संबोधितकेले

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारीच्या समक्ष जनतेच्या तक्रारींचा निपटारा

    मुखेड प्रतिनिधी:-  मुखेड पंचायत समिती येथे  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्याउपस्थितीत मंगळवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या तक्रार निवारण दिनाच्यानागरिकांच्या समस्यांवर चर्चा करुन त्याचे निवारण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्पसंचालक डॉ. संजय तुबाकले यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी नागरिकांच्या व्यक्तिगत तक्रारी ऐकून त्यांच्यावर तत्काळउपाययोजना करण्याचे आदेश दिले. तक्रार निवारण दिनाच्या आयोजनामुळे नागरिकांना त्यांच्यासमस्यांबाबत त्वरित उत्तर मिळाली. तक्रार निवारण उपक्रमामुळे प्रशासन व नागरिकांमध्ये सुसंवादाची भावना निर्माण झाली. तसेच समस्यांचेत्वरित निराकरण करण्यात आले. यावेळी नागरिकांनी दिलेले निवेदन जिल्हा स्तरावर संबंधीत विभागप्रमुखांना वर्ग करण्यात आले असून त्या तक्रारीचे लवकरच निवारण करण्यात येणार आहे. तक्रारींचा आढावा घेण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमारमुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, जलजिवन मिशचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी नारायण मिसाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण घुले, समाजकल्याण अधिकारीसत्येंद्र आऊलवार, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी थोरात, कार्यकारी अभियंता भोजराज, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार तसेच विविध विभागाचे खाते प्रमुख, गटविकास अधिकारी सी. एल. रामोड आदींची उपस्थिती होती

    Read More »
  • आरोग्य

    वैदिक साहित्य आणि पर्यावरण या विषयावर आँनलाईन व्याख्यान संपन्न

    मुखेड प्रतिनिधी :-येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय , नांदेडच्या संस्कृत विभागाच्या वतीने 28 फेब्रुवारी विज्ञान…

    Read More »
  • संपादकीय

    रमजान मध्ये अदा केली जाणारी तरावीहची नमाज रोजच्या नमाजांपेक्षा किती वेगळी आहे?

    मुखेड प्रतिनिधी:- तरावीह नमाज ही एक विशेष प्रकारची नमाज आहे, जी रमजानच्या पवित्र महिन्यात अदा केली जाते. तरावीह नमाजमध्ये सहसा ८ किंवा २० रकात असतात. या लेखात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कीरमजानमध्ये अदा केली जाणारी तरावीह नमाज रोज अदा केल्या जाणाऱ्या नमाजपेक्षा किती वेगळी आहेआणि त्याचे फळ काय आहे. रमजान महिना इस्लाममध्ये सर्वात खास मानला जातो, जो इस्लामिक (हिजरी) कॅलेंडरचा नववा महिनाआहे. रमजान महिना हा उपासना, दया आणि आशीर्वादाचा महिना मानला जातो. रमजान–ए–पाक महिना १किंवा २ मार्चपासून सुरू होणार आहे. प्रत्येक मुस्लिमांसाठी या महिन्याचे खूप महत्त्व आहे. रमजानचा चंद्र दिसल्यानंतर, नमाज, उपासना आणि प्रार्थनांचा काळ सुरू होतो. रमजान महिन्यात, मुस्लिमलोक उपवास ठेवतात आणि अल्लाहची प्रार्थना करण्यात व्यस्त राहतात. इस्लामच्या पाच कर्तव्यांपैकी एकअसलेल्या रमजान महिन्यात प्रत्येक मुस्लिमाने उपवास ठेवणे अनिवार्य आहे. इस्लाममध्ये पाच कर्तव्येआहेत: – शहीद, नमाज, रोजा, जकात आणि हज. अशा परिस्थितीत, दिवसातून पाच वेळा नमाज अदा करणे हा इस्लामचा मूलभूत भाग आहे. इस्लाममध्ये, अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांसाठी नमाज अनिवार्य आहे, मग ते पुरुषअसोत किंवा महिला, गरीब असोत किंवा श्रीमंत, प्रत्येकाने दिवसातून पाच वेळा नमाज अदा करणेआवश्यक आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात, पाच वेळेच्या नमाजांव्यतिरिक्त, आणखी एक नमाज देखीलअदा केली जाते ज्याला तरावीह म्हणतात. तारावीहची नमाज सुन्नत आहे. रमजानमध्ये अदा केल्या जाणाऱ्या तरावीहच्या नमाज या रमजानमध्ये इशाच्या नमाजानंतर अदा केल्याजाणाऱ्या पाच वेळाच्या नमाजांपेक्षा वेगळ्या असतात. तरावीहची नमाज सुन्नत मानली जाते. इस्लाममध्येसुन्नतचा अर्थ तुमच्या स्वतःच्या इच्छेवर अवलंबून आहे. ते न करण्यात काही पाप नाही पण ते केले तरजास्त बक्षीस मिळते. सुन्नत म्हणजे पैगंबर मुहम्मद यांच्या पावलावर पाऊल ठेवणे. तर इस्लाममध्ये, फर्जनमाज म्हणजे ती नमाज जी प्रत्येक मुस्लिमाने पठण करणे अनिवार्य आहे. अनिवार्य नमाज न अदा करणे हेपाप मानले जाते. इस्लाममध्ये पाच अनिवार्य नमाज आहेत: – १)फज्र (पहाट) २)जुहर (दुपारी) ३)असर (सूर्यास्तापूर्वी) ४)मगरिब (सूर्यास्तानंतर) ५)ईशा (रात्र) तारावीहची नमाज: रमजान महिना इस्लाममध्ये सर्वात खास मानला जातो, जो इस्लामिक (हिजरी) कॅलेंडरचा नववा महिना आहे. रमजान महिना हा उपासना, दया आणि आशीर्वादाचा महिना मानला जातो. रमजान–ए–पाक महिना १ किंवा २ मार्चपासून सुरू होणार आहे. प्रत्येक मुस्लिमांसाठी या महिन्याचे खूपमहत्त्व आहे. रमजानचा चंद्र दिसल्यानंतर, नमाज, उपासना आणि प्रार्थनांचा काळ सुरू होतो. रमजान महिन्यात, मुस्लिमलोक उपवास ठेवतात आणि अल्लाहची प्रार्थना करण्यात व्यस्त राहतात. इस्लामच्या पाच कर्तव्यांपैकी एकअसलेल्या रमजान महिन्यात प्रत्येक मुस्लिमाने उपवास ठेवणे अनिवार्य आहे. इस्लाममध्ये पाच कर्तव्येआहेत: – शहीद, नमाज, रोजा, जकात आणि हज. अशा परिस्थितीत, दिवसातून पाच वेळा नमाज अदा करणे हा इस्लामचा मूलभूत भाग आहे. इस्लाममध्ये, अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांसाठी नमाज अनिवार्य आहे, मग ते पुरुषअसोत किंवा महिला, गरीब असोत किंवा श्रीमंत, प्रत्येकाने दिवसातून पाच वेळा नमाज अदा करणेआवश्यक आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात, पाच वेळेच्या नमाजांव्यतिरिक्त, आणखी एक नमाज देखीलअदा केली जाते ज्याला तरावीह म्हणतात.…

    Read More »
Back to top button