Uncategorized

  • विशेष मतदार नावनोंदणी अभियानात ३ हजार ७५० नवे मतदार.

    मुखेड प्रतिनिधी:-  निवडणूक आयोगाच्या आदेशाने राज्यात ६ ते २० ऑगस्ट दरम्यान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत विशेषमतदार नावनोंदणी मोहीम राबवण्यात आली यामध्ये नव्याने ३ हजार ७५० मतदारांची वाढ झाली असूनमुखेड–कंधार विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लक्ष १ हजार ७६८ मतदारांची संख्या झाली आहे. यातमहिला १ लाख ४४ हजार ५१६ तर १ लाख ५७ हजार २४४ पुरुष मतदार आहेत. निवडणुक विभागाने मतदार यादी अपडेट करण्याचे काम हाती घेतले होते. यामध्ये नवीन मतदारांची नांवनोंदणी करणे, मतदारांची नावे मतदारांचा पूर्ण पत्ता दुरुस्ती करणे यासह अन्य तपशील दुरुस्त करण्याचेकाम केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत निवडणूक विभागाने मोहीमेतंर्गत केले आहे. नविन मतदार नावनोंदणीमध्ये महिला मतदार २ हजार ३७२ तर पुरुष १ हजार ३७८ मतदारांनी नावाची नोंदणी केली आहेया नोंदीत पुरुषांपेक्षा महिलांची मतदारांची अधिक नोंद झाली आहे. दिनांक ३० ऑगस्ट रोजी निवडणूकविभागामार्फत अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादिनुसार ३लक्ष १ हजार ७६८ मतदार असून यात १ लाख ४४ हजार ५१६ महिला तर १ लाख ५७ हजार २४४ पुरुषमतदाराचा समावेश आहे. सदर मतदार यादी अपडेट करण्याच्या मोहिमेत मतदान अधिकारी तथाउपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक मतदान अधिकारी, तहसीलदार राजेशजाधव, महसूल सहाय्यक संदीप भुरे, राजाबाई गायकवाड, संगणक चालक बबलू आत्तार यांनी परिश्रमघेतले

    Read More »
  • येवती अतिवृष्टी अनुदान गैरव्यवहार करणाऱ्यांना निलंबीत करा

    मुखेड प्रतिनिधी:- मुखेड तालुक्यातील येवती परिसरात जुलै २०२३ मध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस झाला त्यात शेती खरडूनजाऊन व घरात पानी घुसून अतोनाथ नुकसान झाले याची दखल घेऊन राज्य सरकार मदत जाहीर केले पणस्थानिक पदाधिकारी व अधिकारी मिळून बोगस नोंदणी करून पैशाची देवघेव करून मोठी अपरातफार केलेहे मा तहसीलदार साहेबांनी नेमलेल्या चौकसी समितीच्या अहवाल मधून सिद्ध झाले आहे. व अनेक पात्रलाभार्थी वंचित राहिले. सर्व खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून येवती येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्तेशंकर नागरगोजे याच्या नेतृत्वाखाली दोन वेळा ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण झाले. या संबंधीचेसविस्तर निवेदन मुख्यमंत्री, विभागीय उपायुक्त संभाजीनगर, जिल्हाधिकारी नांदेड, उपजिल्हाधिकारीदेगलूर, व तहसीलदार मुखेड देण्यात आले आहे. तसे संबंधित अधिकाऱ्याकडून चौकशीचे व शिस्तभंगकार्यवाही करण्याचे आदेश निघाले पण ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. सदरीत घोटाळा तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी आणि सरपंचयाच्या संगणमताने झाला असून ही सरकारी पैशाची लूट आहे व गरीब व गरजू लोकांवर केलेला अन्यायआहे. अशा असह्या लोकांचा लढा येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर नागरगोजे व सहकाऱ्यांनी गेलीवर्षभरापासून सतत चालू ठेवला आहे. जोपर्यत संबंधित दोषहीवर कार्यवाही होत नाही तोपर्यत हा लढाअसाच चालू ठेवण्याचा निर्धार गांवकरी मंडळीने केला आहे.

    Read More »
  • गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद शांततेत साजरे करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

     शांतता समितीची बैठक ;उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन  ध्वनी प्रदूषण मुक्त उत्सव राबविण्यावर भर दयावा  नांदेडप्रतिनिधी :-   गणेश उत्सव आणि ईद-…

    Read More »
  • गाळेधारकांना नोटीस देणाऱ्या मार्केट कमिटीला रस्ते विकता येतात का?

    ० काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. श्रावण रॅपणवाड  यांचा सवाल मुखेड प्रतिनिधी:- मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्या कारणासाठी गाळे दिले आहे त्या कारणासाठी उपयोग होत नसेलतर कारवाईची नोटीस देणाऱ्या बाजार समितीला समितीतील ले आऊट चे रस्ते लीज डीड करून देण्याचाअधिकार आहे काय? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. श्रावण रॅपणवाड यांनी केला आहे. मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीने काही गाळेधारकांना कारवाईच्या नोटिसा काढल्या आहेत त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून कृषी उत्पन्न बाजारसमितीला अनेक प्रश्न केले आहेत. मुखेड कृषी उत्पन्न बाजार समिती ही कायम भ्रष्टाचार व अनागोंदीकारभारामुळे चर्चेत असते, यापूर्वी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती वरील त्या आरोपांचे खंडन झालेआहे काय? एखाद्या गाळ्यात राजकीय पक्षाचे कार्यालय थाटले म्हणून नोटीस काढणाऱ्या कृषी उत्पन्नबाजार समितीने यापूर्वी कोणते नियम पाळले आहेत? कृषी निवास, गुरांसाठी पानवठा, चाऱ्याची व्यवस्थाकुठे आहेत? बाजार समितीच्या जागेत सर्वच गाळयांवर निवासी घरे आहेत हे कोणत्या नियमात बसते ? समितीकडून शेतकऱ्यांना कोणता न्याय मिळतो? एवढेच नव्हे बाजार समितीने आतापर्यंत ले आऊटमधीलकिती डांबरी आणि सिमेंट रोडचे लीज डिड करून दिले आहेत यावर कधी प्रकाश पडला आहे काय ? ५रस्त्यांत नुकतेच लोकप्रतिनिधीच्या दबावात शहरातून मोंढा परिसरात जाणारा २० फुटांचा मुख्य डांबरीरस्ताच लीज डिड करून दिलेला आहे. अहिल्याबाई होळकर प्रवेशद्वारापासून समितीच्या कार्यालयापर्यंत ४०फुटांचा रोड मुक्त करणे आवश्यक असताना दोन्ही बाजूच्या व्यापाऱ्यांकडून मलिदा लाटून त्यांच्या नावेकरून देण्यात आलेली आहेत. जांब उपसमितीच्या ताब्यातील व्यापारी गाळ्यांचे सरळ सरळ व्यापारीकरणकरण्यात आले असून यासाठी लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील एका खास संचालकांची नेमणूकच केली होती. यामुळे व अनेक अनागोंदी कारभारामुळे मुखेड कृषी उत्पन्न बाजार समिती प्रसिद्ध असतानाच एक दोनगाळेधारकांना पक्षीय राजकीय द्वेषापोटी नोटिसा काढणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी होय असेहीप्रसिद्धी पत्रकात शेवटी डॉ. श्रावण रॅपणवाड यांनी म्हटले आहे.

    Read More »
  • मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

    मुंबई दि. ६ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात…

    Read More »
  • जि.प.मुलींच्या शाळेचीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवडिबद्दल सत्कार.

    खा.गोपछडे,आ.राठोड,शिक्षणाधिकारी बिरगे यांच्या हस्ते गौरव. मुखेड / प्रतिनिधी. लातुर येथे विभागस्तरीय झालेल्या राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कुल…

    Read More »
  • देशमुख,डावकरे,बाराहत्ते तालुकास्तरिय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

    मुखेड / प्रतिनिधी. पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड प्रशालेचे क्रिडा शिक्षक अंबादास देशमुख, विषय शिक्षक चंद्रकांत डावकरे व सहशिक्षिका…

    Read More »
  • जि.प.ब्राँच शाळेचे शिक्षक मोहंमद अत्तार यांचे सेट परिक्षेत यश.

    मुखेड / प्रतिनिधी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रॅंच मुखेड येथील प्राथमिक…

    Read More »
  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी

    आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी नोंदवावी  नांदेड,दि. 6 सप्टेंबर : जिल्ह्यातील अनेक युवक आपले शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या शोधात आहेत. युवकांना…

    Read More »
  • विधानसभेला ‘लाडकी बहीण योजने’चा महायुतीला फायदा होणार का? सर्व्हेतून धक्कादायक माहितीसमोर

    मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर राज्यातसत्ताधारी महायुतीने अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजनेचा देखीलसमावेश आहे. या योजनेद्वारे राज्यातील महिलांना दरमहिना १५०० रूपयांची आर्थिक मदत सरकार देत आहेत. राज्यातविधानसभा निवडणुका ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगानेसत्ताधारी पक्षाने ही योजना सुरू केलीय, असा आरोप विरोधक करत आहेत. आता खरंच महायुतीलाविधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण योजने‘चा फायदा होणार का? हे जाणून घेवू या. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक लोकोपयोगी योजना सुरूकेल्यात. यामध्ये ‘लाडकी बहीण योजना‘ ही प्रमुख आहे. सरकारने ८० लाख महिलांच्या खात्यावर तीनहजार रुपये जमा केले आहेत. महिला सक्षमीकरणावर भर देणारं हे पाऊल गेम चेंजर असल्याचं महायुतीनेम्हटलंय. याबाबत राज्याचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि सेफॉलॉजिस्ट दयानंद नेने यांनी १६ ऑगस्ट ते२५ ऑगस्ट दरम्यान राज्यात सर्वेक्षण केलंय. यामध्ये त्यांनी ‘लाडकी बहीण योजने‘चा महायुतीला फायदाहोणार का? असा एक प्रश्न देखील विचारलेला होता. सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर सर्वेक्षण केलेल्या एकूण लोकांपैकी ४० टक्के लोकांनी महायुतीला फायदा होईल, असं सकारात्मकप्रतिसाद दिलाय. मात्र ३७ टक्के लोकांनी नकारार्थी उत्तर दिलंय. तर २३ टक्के लोकांनी माहिती नसल्याचंनमूद केलंय. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी मोठे कार्यक्रमदेखील आयोजित केले होते. महाआघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने लाडकी बहीण योजनेवरनिवडणूकपूर्वी प्रचार केंद्रित केलाय. या योजनेमुळे महायुतीच्या बाजूने कोणतीही लाट निर्माण झालेलीनाही, असं मत दयानंद नेने यांनी सर्वेक्षणाच्या निकालानंतर व्यक्त केलंय. ही योजना निवडणूक स्टंट असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केलीय. सरकार फुकटात पैसे वाटप करतअसेल तर का सोडायचं? असं देखील अनेकजण म्हणत आहेत. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्या अशीव्यक्तिगत प्रतिक्रिया नेने यांनी दिलीय. कारण आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबातील अनेक महिलांनाया योजनेचा लाभ मिळालेला आहे, याबाबत राज्य सरकारने चौकशी करावी, असं देखील नेने म्हणालेआहेत. लाडकी बहीण योजने’चा महायुतीला फायदा होणार? यंदा राज्यात अर्थसंकल्पात महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत २१ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेसाठी अर्जदारमहिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं. महिलेच्या कुटुंबातील कोणतीहीसदस्य आयकर भरत असेल, तर ती महिला या योजनेसाठी पात्र नाही. राज्यातील सुमारे दीड कोटी महिलाया योजनेसाठी पात्र ठरण्याची अपेक्षा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या योजनेला थेट विरोध केला नसून प्रश्न उपस्थित केलेत. ही योजनानिवडणूक स्टंट असल्याची टीका विरोधकांकडून केली जातेय. हरियाणा आणि जम्मू–काश्मीरमधीलनिवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्याचीशक्यता आहे. येत्या ९ ऑक्टोबरला निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल, असाअंदाज आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेचा किरकोळ लाभ महायुती सरकारला मिळतानादिसत असल्याचं सर्वेमधून दिसतंय

    Read More »
Back to top button