रक्षाबंधन निमित्त जि.प.मुलींचे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी पाठवल्या ५०० राख्या.

▫️”माझी शाळा माझे उपक्रम” अतंर्गत विद्यार्थ्यांनी तयार केल्या राख्या व भेटकार्ड पत्र,शुभेच्छा संदेश.
मुखेड / प्रतिनिधी. दि.०९ ऑगस्ट २५
शहरातील पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड ही शाळा नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविण्यामध्ये एक पाऊल पुढे असते.आज रक्षाबंधन असल्यामुळे या शाळेतील विद्यार्थीनिंनी “माझी शाळा माझे उपक्रम” अंतर्गत रक्षाबंधनाच्या निमित्ताने आगळा वेगळा उपक्रम राबवत देशासाठी आपले जीव धोक्यात घालुन सीमेवर सेवा बजावणाऱ्या भारतीय वीर सैनिकांसाठी कविता,तिरंगा राख्या,भेटकार्ड पत्र व शुभेच्छा संदेश पत्र स्वताह तयार करुन ५०० राख्या सैनिकांसाठी सिमेवर पाठवल्या आहेत या उपक्रमांमुळे विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.
प्रशालेतील इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी देशासाठी अहोरात्र सज्ज असलेल्या जवानांप्रती आपली कृतज्ञता व प्रेम व्यक्त करण्यासाठी आकर्षक राख्या व भावनिक संदेश असलेली ग्रीटिंग कार्डस तयार केले त्यामध्ये त्यांनी भारतीय जवानांना विविध शुभेच्छा संदेश लिहून पाठवले. देशभक्तीवर आधारित गीते, कविता व त्यांच्या मनातील भावना त्यात त्यांनी लिहिल्या.रक्षाबंधनाच्या शुभेच्छा लिहून पाठवल्या व स्वतः हाताने तयार केलेल्या तिरंगा राख्या पाठवल्या आहेत.सदरील कार्यक्रमात आपल्या देशाच्या जवानांप्रती असलेल्या भावना विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होत्या.राखी बॉक्समध्ये टाकल्यानंतर जयहिंद,भारत माता की जय अशा घोषणा विद्यार्थिनी देत होत्या.त्यामुळे शाळेचे वातावरण देशप्रेमाने भरभरुन निघाले होते.या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार महेताब शेख व समितीचे सदस्य तसेच मुखेड येथील डॉ.प्रकाश हिमगिरे,डॉ.शिवानंद स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहशिक्षक केंद्रे व्यंकटी यांनी केले त्यांनी कार्यक्रमा विषयी भुमिका विशद केली तर सांस्कृतिक विभागप्रमुख दिलीपराव देवकांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या मनोगतातुन देशप्रेमाची भावना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली.सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दिलीपराव कांबळे,सांस्कृतिक विभागप्रमुख दिलीपराव देवकांबळे यांनी पुढाकार घेतला तसेच या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व्यंकटी केंद्रे यांनी केले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक राजपुत एस.बी.,जाधव व्ही. एस.,सौ.मधुमती लोणीकर, बरकतउल्ला के.एन.,मुद्देवाड बी.आर.,अनकाडे जी.एन., जाधव ए.के.,श्रीमती पुट्टावार एम.पी.,सौ.साळुंके, देशमुख ए.डी.,लोहबंदे डी.डी.,स्वामी एन.एस,आलमल्ले एस.व्ही, इंगळे के.बी.,शृंगारे एस.एम., मेहरकर आर.बी.,दारकु एस. जे,भालेराव एच.एम,गोंड बी.एम,दूरनाळे बी.एन,डावकरे सी.एम,भालेराव पी.एन,पवार एच.जी.,डोईजड पी.के.,श्रीमती स्वामी ए.एम.,सौ.गवते एस.एच.,सौ.पाटील एस.व्हि., सौ.हराळे एस.एन.,धनशेट्टी एस.यू.,मुपडे एस.जी.,सौ. माळगे एस.जी.,सौ.दीनकर आर.एम.,सौ.उबाळे एस.के., सौ.बारहाते डी.बी.,सौ.येवतीकर एन.पी.,सौ.टाकळीकर ए.सी., श्रीमती शेटकार जी.आर.,सौ. तांबोळी एस.एल.,सौ.कदम आर.जी.,सौ.गडगिळे एल.एम. कला,क्रीडा,कार्यानुभव शिक्षक भवानीसिंह चौव्हाण,जिवनराव वडजे,अकबर सय्यद,सेवक अवधुत गिरी व सौ.हरीबाई केळे, ब्युॅटी-रिटेलचे फय्युम पटेल, कल्पना राजकौर,प्रशांत पवार यांनी परश्रम घेतले.सदरील राख्यांची पार्सल पॅकिंग मुखेड येथील योगेश्वरी जनरल स्टोअरचे भुतडा यांच्यातर्फे मोफत करून देण्यात आले.शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.याप्रसंगी विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



