मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचार विरोधात विचार विनिमय बैठक संपन्न

नांदेड प्रतिनिधी:-
मुस्लिम अत्याचार संदर्भामध्ये विचार विनिमय करण्यासाठी नांदेड येथे दि ४ एप्रिल रोजी नॅशनल कॉन्फरन्सफॉर मायनॉरिटी चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामावेशक बैठकीचे आयोजनअब्दुल बशीर माजीद यांच्या वतीने करण्यात आले होते.
मशीदींवरील हल्ले , मुस्लिमांवरील हल्ले , मदरशांवरील हल्ले त्याचबरोबर हेटस्पीच वक्फ बोर्ड सुधारणाविधेयक इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर विचार विनिमय करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आलेहोत.
या बैठकीमध्ये राज्यात सुरू असलेल्या मुस्लिम विरोधी धार्मिक हिंसाचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्तकरण्यात आली असून अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्राचं पुरोगामीत्व संपवत आहेत. तसेच अशाप्रकारच्या सातत्यपूर्ण होणाऱ्या दंगली , हिंसाचाराच्या घटना व हेच स्पीचमुळे राज्यातील मुस्लिम समाजभयग्रस्त झाला असून या भीतीच्या छावटातून त्यांना काढणे आवश्यक आहे व यासाठी सर्व धर्मनिरपेक्षकार्यकर्त्यांनी, व्यक्तींनी पुढाकार घ्यायला हवा अशी भूमिका या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

सदर घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी लवकरच राज्यव्यापी शांततापूर्वक वातावरणात आंदोलने करण्यातयेणार असलाचे सांगण्यात आले. दरम्यान राज्यातील मागील १० वर्षांमध्ये घडलेल्या मुस्लिम अत्यांचारांच्याघटनांचे संकलन करून त्याचा विस्तृत अहवाल तयार करून तो राज्यपाल , राष्ट्रपती , मुख्यमंत्री , प्रधानमंत्रीयांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना पाठविण्यात येणारअसल्याची माहिती यावेळी राहुल डंबाळे यांनी दिली.

या बैठकीत विविध जातीधर्माचे लोक सहभागी झाले होते. ज्यात प्रामुख्याने ॲड. झेड सिद्दिकी साहेब , ॲड. अब्दुल रहमान सिद्दिकी , ख्रिस्ती धरामगुरु रेवरंड जॉन्सन जेकब, आंबेडकरी चळवळीतील नेते सुरेशदादा गायकवाड, निवृत्त न्यायाधीश पटेल व निवृत्त न्यायाधीश शफातुल्ला खान,अल्पसंख्याकांचे नेतेफिरोज खान लाला , श्याम वडजे पाटील , गंगाधर गायकवाड , विजय गाबने , मोहम्मद खान पठाण , मोहम्मद अझरुद्दीन , सय्यद शेर अली , शिरीन बेगम, रहीम अहमद खान , मोहम्मद वसीम , आरिफ खानपठाण , नासिर खातीर , आबिद फिरदोस खान , मुखेड तालुकाद्यक्ष आसद बलखी , युवा जिल्हाध्यक्ष जलील पठाण, जिल्हाध्यक्ष महेताब शेख , यांचेसह अनेक आजी–माजी नगरसेवक व राजकीय नेते याबैठकीत सहभागी झाले होते.

नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे मराठवाडा अध्यक्ष अब्दुल बशीर माजीद यांनी बैठकीचे आयोजन केलेहोते. या बैठकीत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. पुढील आठवड्यात छत्रपतीसंभाजी नगर अर्थात औरंगाबाद या ठिकाणी आणखीन एक विभागीय आढावा बैठक मुस्लिम अत्याचाराच्याअनुषंगाने घेण्यात येणार असल्याचेही अब्दुल बशीर माजिद यांनी सांगितले.




