Uncategorized

सत्ताधारी राजकारण्यांच्या उदासीनतेमुळे आंतरराष्ट्रीय दर्ज्याचा स्टेडीयम व खेळाडुंची हेंळसांड थांबवण्याचे प्रयत्न गरजेचे -फारुक अहमद

नांदेड प्रतिनिधी :- मोहम्मद रफीख

फारुक अहमद मित्र मंडळाच्या वतिने दिवंगत आमदार सय्यद फारुक पाशा यांच्या स्मृतीत “आमदार चषक” क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन

नांदेडः सर्वच क्षेत्रात पुढाकार घेतल्या शिवाय कोणताही समाज, शहर व जिल्हा परिपूर्ण होत नसतो मराठवाड्यातील एकट्या नांदेडकडे आंतरराष्ट्रीय स्तराचा स्टेडीयम असुन ही केवळ सत्ताधारी राजकारण्यांच्या उदासीनतेमुळे नांदेड जिल्ह्यातील खेळाडुंची हेळसांडच होत आली आहे. जिल्ह्यातील व शहरातील क्रिकेट खेळाडुंना व क्रिकेट प्रेमींना प्रतिसाद देण्याकरीता फारुक अहमद मित्र मंडळाच्यावतीने पहिले हॅट्रीक आमदार राहीलेले दिवंगत आमदार स. फारुक पाशा यांच्या स्मृतीत “आमदार चषक” लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती वंचितचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येत्या 3 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम येथे हे क्रिकेट सामने होणार आहे. विजेत्या संघाला 55 हजार 555 आणि उपविजेत्या संघाला 33 हजार 333 रुपये रोख पारितोषिक आणि चषक दिली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २३ जानेवारी पर्यंत इच्छुक टिमला एन्ट्री मुदत देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातून जे खेळाडु रणजी ट्राफी खेळलेले आहेत त्यांचा यथोचित सत्कार सुध्दा करण्यात येणार आहे. नांदेडच्या तरुणांनी विविध खेळामध्ये आपली चुणूक दाखवुन दिलेली आहे परंतु स्थानीक व राज्याच्या उदासीनतेमुळे राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय स्तरावरील संधी हुकते म्हणुन दर्जेदार स्पर्धांचे आयोजन करुन नांदेडच्या स्टेडीयमचा लाभ घेऊन नांदेडचे नाव गाजले पाहीजे हा उदात्त हेतु समोर ठेवुन हे आयोजन करत असल्याचे ही फारुक अहमद यांनी मांडले.

कॉंग्रेसला विसर पडलेल्या पहिले हॅट्रीक आमदार फारुक पाशा यांच्या स्मृतींना वंचित उजाळा देत आहे सलग तिनदा जनतेतुन निवडुन येऊन विधान भवनाचे उप-सभापती व राज्य शिक्षण मंत्री व चौथ्या वेळी विधानपरिषदेवर निवडुन येऊन आमदार असलेल्या सय्यद फारुक पाशा यांना त्यांचा पक्ष असलेल्या कॉंग्रेसने त्यांची ओळख म्हणुन नामो-निशाण पुसुन टाकण्याचे काम केले आहे. आजच्या पिढीला पहिले खासदार हरीहरराव सोनुळे, आमदार नुरुल्लाखान या बहुजन-अल्पसंख्यंक लोकप्रतिनिधींचा परिचय नाही परंतु राजकारणातील एक कार्यकर्ता म्हणुन हे नावे जिवंत ठेवण्याचा प्रामाणिकपणा जपण्याचा काम आम्ही करत आहेत असे ही वंचितचे प्रवक्ते फारुक अहमद यांनी सांगितले.

या वेळी राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, उत्तरचे महानगर अध्यक्ष अयुब खान, दक्षिण महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, व्यवस्थापन समीतीचे व क्रिकेट एक्सपर्ट खेळाडु महंमद फहीम, महंमद अथर व मोईन अ. रहीम, जावेद हाश्मी, मं. कासीम, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष केशव कांबळे, प्रबुध्दभारतचे वितरक प्रतिनिधी सुनिल सोनसळे, महानगर महासचिव अशोक काकांडीकर, महासचिव अमृत नरंगलकर, एसएम भंडारे, शिवाजी शेळके, विजय भंडारे, शहर प्रवक्ता प्रा नंदकुमार गच्चे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button