उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही

कुलरच्या खरेदी विक्री व्यवसायमध्ये चांगलीच वाढ
मुखेड प्रतिनिधी
मुखेड तालुक्यात मागिल आठवड्यापासून तापमानाने ४० अंश सेल्सिअस पार केले असुन या कडाक्याच्या उन्हाळ्याने नागरिकांसह सर्वच सजिव प्राण्यांची लाहीलाही होत आहे. सकाळी ८ वाजे पासुनच सुर्य आग ओकत असल्याने गावतील मुख्य बाजार पेठ, तहसील परिसर, बारहाळी नाका , बसस्थानक, आठवडी बाजार,मोढा या अतिशय वर्दळीच्या ठिकाणी सात आठ दिवसापासुन माणसां अभावी रस्ते तथा गावातील वर्दळीचे ठिकाणे सुनसान पडल्याचे दिसुन येत आहे. गेल्या सात ते आठ दिवसापासून वाढल्यामुळे सुमसाम तापमान वाहतुकही झालेली असुन याचा व्यवसायावर परीणाम झालेला दिसुन येत आहे. व्यवसायिक ग्राहक नसल्याने व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. दरम्यान, वाढलेल्या तापमानामुळे ग्रामीण भागात, नवीन कुलरच्या विक्रमी विक्री होत आहे.
तसेच टोप्या तर महिलांकरिता ओढण्या हातरुमालांची विक्री वाढलेली आहे. बहुतांशी महिला व मुली उन्हापासुन बचायत्मक उपाय म्हणून कानाला चेहऱ्याला ओढण्या गुंडाळूनच घराबाहेर पडतांना दिसुन येत आहे. त्यामुळे या साहित्याची विक्री अचानकच वाढलेली दिसत आहे. तर दुसरीकडे या वाढत्या तापमाणाने शितपेयांची मागणी वाढली असल्याने छोट्या-मोठ्या शीतपेय दुकानदारांचे व्यावसाय चांगले चालत असल्याने आता शितपेय,ज्युस सेंटर रसवंतीचे गाडे रस्त्यावर बघायला मिळत आहे. तसेच कुलर, पंखे, माठ, जारच्या पाणी विक्रेत्यांनाही सुगीचे दिवस आलेले आहे. तथा भाजी मंडी व फळविक्री मार्केटमध्ये कलिंगड, खरबुज, आंब्याच्या कैच्या कैऱ्या अननस आदी फळे खरेदीकडे नागरीकांचा कल अधिक आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाचा कडाका यामुळे नागरिक रस्त्यावर उतरेनासे झाले असल्याने गल्ली बोळात शुकशुकाट असून रस्तेही ओस पडले आहेत.



