Uncategorized

रावणगाव ग्रामपंचायत समोर बसलेल्या उपोषणास मामीडवाड यांनी दिली भेट !!


मुखेड प्रतिनिधी :- तालुक्यातील लेंडी प्रधान प्रकल्पात जात आसलेल्या रावणगाव येथील सहा कुटूंबास घराचा मावेजा मिळाला नाही तो मिळावा ही मागणी घेऊन रावणगांव ग्रामपंचायत समोर आज दि. 18 पासून उपोषण सुरु करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर व्रत्त असे कि; लेंडी धरणाचे काम सुरु होऊन आज 38 वर्ष होत आहेत.तरी आज पर्यंत म्हणावे तेवढी धरणाच्या कामास आली नाही परंतू आगामी काळात लेंडी प्रकल्पाचे काम प्रगती पथावर सुरु आहे . रावणगाव येथील घरांचा मावेजा मिळाला परंतू संबंधीत अधिकारी किंवा राजकिय द्वेशा मुळे रावणगाव येथील उपोषण कर्ते कुंटूबास हे आपली मिळकत घरांच्या मावेजा पासून आजतागायत वंचित आहेत. तशी मिळकत क्र. ग्रामपंचायत नमूना नंबर 8 अ वर नोंद आहे.तो ही सन1986/ 1987 आहे ती आजपर्यंत आहे. शासन निर्णय असा आहे की बुडीत क्षेत्रातील गावठान मधील एक घर किंवा शेतजमीनी तून एक गुंठा जर राहीला आसेल त्यांचा मावेजा देण्यात यावा परंतू उपोषण कर्त्याचे वडीलो पार्जीत घरे आसून सुद्धा शासन मावेजा देण्यास आजपर्यंत चाल ढकल करीत आहे. या घर क्रमांकावर पुर्णवसन येथे 2012 साली भुखंड मिळाले, घर कुल सुद्धा मिळाले परंतू वारंवार तोंडी व लेखी मागणी करून सुद्धा शासन कसल्याच प्रकारची दखल घेतली जात नाही. संबधीत विभागास तसे वारंवार कागद पत्र पुरावे देण्यात आले. कोरडया आश्वासना शिवाय कांहीच केल्या जात नाही. मावेजाच विषय निकाली लागला नाही. शासन ठरवून दिलेल्या लोकशाही दिनी सुद्धा हा प्रश्न मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या पटलावर ठेवण्यात आला होता परंतू तुम्हाला कळवण्यात येईल अशी तोंडी सुचना देऊन पाठवण्यात आले. परंतू तेथे सुद्धा हा विषय संबधीता कडून दरवल घेण्यात आली नाही. म्हणून बाधीत कुटुंबाची दरवल कोणीच घेत नाही म्हणून घरी परतले.संबंधीत विभागाच्या गलथान कारभारास कंटाळुन आमचे शेती व घरे शासनास कवडी मोल देऊन सुद्धा गावठान बुडीत क्षेत्रातील घरांचा मावेजा दिला जात नाही म्हणून रावणगांव येथील सहा १) जैनोदीन बंदूसाब शेख घर क्रः239/2, २) बालाजी लक्ष्युमन चिंतलवाड घर क्र. 253 ३) भरत भगवानलाल श्रीवास्तव घर क्र. 154/1,४) सुभाष लक्ष्युमन दाचावार घर क्रं.58,५) खाजा हैदरशा घर क्र. 25 /1,६) रहेमान हैरशा घर क्र.25/2 या घरांच्या मावेजा पासून वंचित आसल्यामुळे मुख्यमंत्री साहेबा सह संबधीत अधिकारी याना लेखी निवेदन देऊन दि.१८/०२/२० २५ पासून रावणगांव येथील ग्रामपंचायत प्रांगणात उपोषणास बसले आहेत. या उपोषणाची दखल घेऊन तहसीलदार जाधव यांच्या आदेशान्वये नायब तहसीलदार मामीलवाड व श्रीरामे यानी दि 20 रोजी उपोषण कर्त्या सोबत चर्चा करून आपली मागणी वरीष्ठ कार्यालया कडे कळवन्यात येईल आसे सांगून गेले. मागणी पुर्ण होई पर्यंत उपोषण सोडणार नाही आसा पवित्रा उपोषण कर्त्यांना घेतली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button