आज मुखेड येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त भव्य मिरवणूक व शोभायात्रेचं आयोजन

मिरवणूकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे:-छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जन्मोत्सव समिती
मुखेड प्रतिनिधी:- २ जून २५
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मुखेड शहरात आज २ जून २०२५ सोमवार रोजी भव्य मिरवणूक वशोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यापूर्वी २६ मे रोजी नियोजित असलेली मिरवणूक पावसाच्याअंदाजामुळे पुढे ढकलण्यात आली होती .या ऐतिहासिक मिरवणुकीचे आयोजन धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज सार्वजनिक जन्मोत्सव समिती, राजमुद्रा सामाजिक संघटना, छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, साईभक्त मित्र मंडळ आदींनी केलं असून, सायंकाळी ४.३० वाजता छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बान्हाळी रोड येथून मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. मिरवणुकीत शिवकालीन देखावे, घोडे–उंटांची मिरवणूक, मर्दानी खेळ, भजनी मंडळं, डीजे संगीत, आकर्षक पुतळा आणि पालखी मिरवणूक असे विविध आकर्षण देखावे असणार आहेत.या कार्यक्रमास शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही राजमुद्राचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील इंगोले, पंकज गायकवाड़ सदाशिव पा. जाधव, अशोक बच्चेवार, गिरिधर पा. केरुरकर, नरेश पा. इंगोले, रति पा, सिरसे, रोहित भोसले, बालाजी पा. बोडके, रामदास पाटिल, श्रीकांत इंगोले, सचिन चव्हाण, विठ्ठल जमादार, गंगाधर घाळेवार, मनोज पा. इंगोले, गजानन साखरे, बालाजी पाटील इंगोले, राजु स्वामी यांनी केले.



