सामाजिक

सातजन्माच्या गाठी अल्पकाळातच का सैल होतेय? नांदेडमध्ये वर्षभरात ३३० हून अधिक घटस्फोट; संवाद हरवतोय,शंका वाढतेय

नांदेड – मोबाईलचा अतिरेकसंवादाचा अभावकरिअरचा ताणएकमेकांविषयी समजून  घेण्याचीवृत्ती… यामुळे नांदेडमध्ये सातजन्माच्या  गाठी अल्पकाळातच सैल होऊ लागली आहे२०२४ मध्ये नांदेडजिल्हा कौटुंबिक न्यायालयात तब्बल ३३१ घटस्फोटाचे खटले दाखल झालेतर यंदाच्या केवळ पाचमहिन्यांतच १६४ नव्या तक्रारी समोर आल्या आहेत.

तुटलेली माणुसकीची नाळसोशल मीडियामधील आभासी जगलॉक असलेले फोनअपत्यावरूनहोणारे वादसासुरवाशीण संघर्षआर्थिक असमतोल – ही आधुनिक घटस्फोटाची नवी कारणं ठरतआहेत७० ते ८० टक्के प्रकरणांमध्ये म्युच्युअल सेपरेशन होत असूनकोर्टाऐवजी सामोपचारातून प्रश्नसोडवले जात आहेत.

घटस्फोट आता फक्त वादामुळेच नव्हेतर संवादाच्या अनुपस्थितीतही होतोय. “नात्यांमध्ये समजून घेणंवेळ देणं आणि संवाद ठेवणं अत्यंत गरजेचं झालं आहे,” असं मत अ‍ॅडप्रसाद रानवळकर यांनी व्यक्तकेलं.

घर तुटू नये म्हणून संवादाचं बंधन मजबूत ठेवा – नाहीतर ‘सातजन्माची’ गाठ एका क्लिकवर तुटू शकते!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button