Uncategorized

मराठा आरक्षणाची लढाई आता मुंबईत….

मुखेड प्रतिनिधी:- २६ ऑगस्ट

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभर तीव्र चळवळ उभारणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हाएकदा आक्रमक झाले असून आता त्यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवार पासून (दि२८ ऑगस्टमराठा समाजाचा विराट मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे .

दि२९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या या भव्य आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुखेड तालुक्यातील हजारो मराठा युवक मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळते आहे.

गावागावांतून सकल मराठा समाजाने मोर्चासाठी जोरदार तयारी केली आहेचावडी वाचनगाव बैठकामशाल रॅलीकीर्तनभजन आदी सांस्कृतिक  सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जातअसूनप्रत्येक मराठा बांधवांना आरक्षणासाठी मुंबई गाठण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 या पार्श्वभूमीवर मुखेड परिसरात मोठी चळवळ उभी राहिली आहे.सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसारयावेळी मुखेड शहरासह तालुक्यातील जवळपास सर्व गावांतून मोठ्या संख्येने तरुणमहिला  ज्येष्ठ नागरिक मुंबईकडे रवाना होणार आहेतपूर्वीच्या आंदोलना पेक्षा या वेळी दहा पटींनी जास्त उपस्थिती दाखवली जाईलअसा विश्वास व्यक्तकरण्यात आला आहे.

दरम्यानमराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावाअन्यथा समाजाचा संयमसुटू शकतोअसा इशारा सकल मराठा समाजातील नेत्यांनी दिला आहे. “मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने सातत्याने आवाज उठवलामात्र अद्यापही योग्य न्याय मिळालेला नाहीत्यामुळे आता लढानिर्णायक टप्प्यात गेला असूनआरक्षणा शिवाय घरी परतणार नाही,” अशा भावना समाजातीलयुवकयुवती व्यक्त करत आहेत.

मुखेड तालुक्यातील विविध संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला असूनसर्वांनी एकदिलाने आंदोलनयशस्वी करण्याचे ठरवले आहेमराठा समाजाची ऐक्यबांधणीउत्साह आणि प्रबळ जनसमर्थन पाहताआगामी मोर्चा ऐतिहासिक ठरणारआहेअसे सकल मराठा समाज मुखेड तालुक्याच्या वतीने व्यक्तकरण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button