Uncategorized

बळीरामपूर येथील विविध विकास कामांच्या मागण्यासाठी बहुजन पँथर चे बेमुदत धरणे आंदोलन


नांदेड प्रतिनिधी:- तालुक्यातील बळीरामपुर
येथील नागरिकांच्या मूलभूत समस्यांची सोडवनुक व्हावी तसेच या परिसरामध्ये शासनाच्या विविध योजना कार्यान्वित व्हाव्यात यासाठी बहुजन पँथर पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २० डिसेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
बहुजन पॅंथर पक्षाच्या वतीने शासनाकडे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये नांदेड तालुक्यातील बळीरामपूर येथील आनंद कंट्री लिकर बार तात्काळ हटविण्यात यावे, बेघर व्यक्तींना विविध योजने अंतर्गत घरकुल योजना प्रभावीपणे राबवून घरे देण्यात यावीत, निराधार योजना राबवून गरजवंतांना आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी, त्यासाठी नविन निराधारांची नोंदणी करण्यात यावी, स्वाधार योजनेसाठी विनाविलंब आर्थिक निधी देण्यात यावा, सुशिक्षीत बेरोजगारांना तात्काळ विनाअट अर्थ सहाय्य करण्यात यावे, नांदेड जिल्ह्यातील खाजगी शिकवणी वर्ग बंद करण्यात यावे, दारिद्रय रेषेखालील लोकांचा सर्वे करून त्यांना दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र देण्यात यावे, नांदेड तालुका व शहरातील गरजवंतांना शिधापत्रिका देण्यात याव्यात.
सदर मागण्यांचे निवेदन नांदेडचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यायलासमोर २० डिसेंबर पासून बहुजन पँथर पक्षातर्फे जनहितार्थ बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष संजय राक्षसे, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी पुष्पाताई गजभारे, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल जोशी व जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जोंधळे नांदेडकर, जिल्हा सचिव संतराम कांबळे, लोहा तालुका संपर्क प्रमुख प्रकाश कांबळे, कलंबर सर्कल प्रमुख धनराज सोनसळे, लोहा तालुकाध्यक्ष शिवा सानेकांबळे, ज्ञानोबा लोकडे, किशन मस्के, आशाबाई चाघमारे, सविता डूबे, भारतबाई वाघमारे, संगिताबाई धुळे, जयश्री नागलवाड, सारिका बोरगे, सुमनबाई शिंदे व कल्पणाबाई भोरगे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button