राजकीय

ठाकरे गटात मोठा भूकंप! ‘ऑपरेशन टायगर’मुळे ६ खासदारांचे बंड; संजय राऊतांचा संताप अनावर, शिवराळ भाषेत हल्लाबोल

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १७ जून २६ 

गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ आता अंतिम टप्प्यात आले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरेगटाला लोकसभेत फार मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘मशाल‘ चिन्हावर निवडून आलेल्या  खासदारां पैकी तब्बल ६ खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचे वृत्त समोर आले आहेयेत्या १९ जूनलाम्हणजेच शिवसेनेच्या वर्धापन दिनी हेबंडखोर खासदार आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतलोकसभेचे गटनेते अरविंद सावंतप्रतोद अनिल देसाई आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतलीया पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचा संयम सुटल्याचे पाहायला मिळालेत्यांनी बंडखोरांवर अत्यंत शेलक्या आणि शिवराळ भाषेत कडाडून हल्ला चढवला.

बंडखोर खासदारांना थेट आव्हान देताना संजय राऊत म्हणाले, “पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलंजर तुम्हाला पक्ष सोडून जायचंच असेलतर हिंमत दाखवा आणि आधी खासदारकीचा राजीनामा द्या!”

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांचा राग अनावर झालाबंडखोरांचा उल्लेख करताना त्यांनी थेट आक्षेपार्ह आणि शिवराळ शब्दांचा वापर केलामाध्यमांना उद्देशून ते म्हणाले“हे सा भो*** लोकंकोण जातात हे… ‘डोन्ट कट‘ (हे कापू नका)! हे बेईमान लोक आहेतहे बेईमान आहेत आणि त्यांच्या रक्तातच बेईमानी आहे!” राऊतांचा हा आक्रमक आणि संतापलेला अवतार पाहून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

एकीकडे  खासदार फुटण्याच्या तयारीत असतानानाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजेयांच्या निष्ठेचे राऊतांनी भरभरून कौतुक केले.

राजेभाऊंचे कौतुक केले पाहिजेते दिल्लीत उतरल्यापासून मीडियाला एकच सांगत आहेत की, ‘आम्ही उद्धव ठाकरें सोबत आहोत‘. याला निष्ठा म्हणतातआज खासदार असू किंवा नसूपण पक्षाने जे दिले ते विसरता येणार नाहीउद्धव ठाकरेंनी आम्हांला भावासारखे वागवले आणि बाळासाहेबांनी वडिलां सारखे प्रेम दिले,” असे राऊत म्हणाले.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राऊतांनी देशातील सर्वोच्च संस्थांवरही अविश्वास दाखवला. “सध्याच्या लोकशाही व्यवस्थेत निवडणूक आयोगसुप्रीम कोर्ट आणि लोकसभा अध्यक्षांचीकाय हैसियत (औकातउरली आहेहे आम्हांला चांगलंच माहीत आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.

 खासदार खरोखरच वेगळी चूल मांडणार काआणि ठाकरे गट हा संभाव्य धोका कसा रोखणारयाचे उत्तर दोन दिवसांनी म्हणजेच १९ जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनीच मिळणार आहेमात्रत्या आधीच राऊतांच्या या ‘कडक‘ आणि शिवराळ विधानांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button