मुखेड तालुक्यातील सात जणांनी सर केले कळसुबाई शिखर

मुखेड प्रतिनिधी:- २५ ऑगस्ट
राज्यातील सर्वोच्च शिखर असलेले कळसुबाई शिखर शनिवार 16 ऑगस्ट रोजी मुखेड तालुक्यातील सहा जणांनी अवघ्या साडेतीन तासाच्या प्रयत्नांत सर केला आहे.
महाराष्ट्राचे एवरेस्ट मानले जाणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील,अकोले तालुक्यात बारी गावच्या हद्दीत असलेले 5,400 फूट उंचीच्या कळसुबाई शिखरावर चढाई करण्याचे स्वप्न अनेक गिर्यारोहक बाळगतात मुखेड येथील सचिन मेनकुदळे, चंद्रकांत येंडे,सुलक्षणा देशमुख, वेदिका येंडे ,
अर्चना पावडे, समृद्धी महाजन, ज्योती महाजन या सात जणांनी शनिवार 16 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात बारी गावातून शिखरावर चढण्याची मोहीम सुरू केली पावसाळ्याच्या काळात असलेल्या ओलसर वाटा,चिखल, दगड यांची निसरडी पायवाट आणि सतत बदलणारे हवामान अशा आव्हानात्मक परिस्थितीत या सहा जणांनी केवळ साडेतीन तासात शिखर सर केला. शिखरावर पोचल्यावर त्याने तिरंगा फडकत भारत माता की जय या जयघोष करून संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला यावेळी सर्वांच्या डोळ्यात अभिमान आणि समाधान झळकत होता कळसुबाई शिखर सर करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते चढाई दरम्यान थकवा पावसाचा मारा आणि निसरड्या दगडामुळे अडचणी आल्या मात्र एकमेकांनी दिलेल्या पाठबळामुळे हे शक्य झाल्याचे मोहिमेच्या अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले.



