लग्नातील वायफळ खर्चाला फाटा! पेठकर कुटुंबाने लग्नकार्यातून काढला संपूर्ण गावाचा ‘अपघाती विमा’

▫️धोंड्याच्या महिन्या’त जपली पुरोगामी विचारधारा
कंधार प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २३ मे २६
लग्न म्हटलं की डोळे दिपवणारा बडेजाव, अवाढव्य खर्च आणि पैशांची उधळण हे समीकरण आताठरलेलं असतं. पण याच थाटामाटाला फाटा देत, नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरायेथील पेठकर कुटुंबाने समाजासमोर एक नवा आणि आदर्श पायंडा घालून दिला आहे. आपल्या घरातीलविवाहसोहळ्याचे औचित्य साधत या कुटुंबाने गावातील तब्बल साडेतीन हजार नागरिकांचा अपघातीविमा उतरवला असून, त्यांच्या या पुरोगामी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सामान्यतः ‘धोंड्याचा महिना‘ (अधिक मास) हा शुभकार्यासाठी वर्ज्य मानला जातो. या काळात लग्नकिंवा इतर मंगल कार्ये करण्याचे अनेकजण टाळतात. मात्र, अंधश्रद्धा आणि जुन्या रूढी–परंपरांना छेददेत पेठकर कुटुंबाने याच महिन्यात विवाहसोहळा संपन्न केला. केवळ लग्न उरकले नाही, तर त्यालासामाजिक भान आणि कर्तव्याची अनोखी जोड दिली.

लग्नात मानपान, अवाजवी रोषणाई किंवा जेवणावळींवर लाखो रुपयांचा चुराडा करण्याऐवजी, पेठकरकुटुंबाने गावातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेचा विचार केला. बहाद्दरपुरा गावातील सुमारे ३,५००लोकांचा अपघाती विमा काढून त्यांनी एकाच वेळी संपूर्ण गावाला सुरक्षिततेचे कवच बहाल केले आहे.
आजकाल लग्नांमध्ये होणारा बडेजाव कर्जबाजारीपणाला कारणीभूत ठरत असताना, पेठकर कुटुंबानेघेतलेला हा निर्णय डोळे उघडणारा आहे. “लग्न असावं तर असं!” अशीच भावना आता परिसरातीलनागरिकांमधून व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही या ‘विमा लग्नाची‘ जोरदार चर्चा सुरू असून, हापुरोगामी विचार इतर कुटुंबांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.
“लग्नाचा आनंद फक्त आमच्यापुरता मर्यादित न राहता, त्याचा फायदा संपूर्ण गावाला व्हावा आणिसंकटाच्या काळात गावकऱ्यांना मदत मिळावी, याच भावनेतून आम्ही हा निर्णय घेतला.” — पेठकर कुटुंब, बहाद्दरपुरा



