Uncategorized

सोयाबीनच्या गंजीला अज्ञाताने लावली आग; शेतकऱ्यांचं नुकसान

मुखेड प्रतिनिधी:- १५ ऑक्टोबर
आधीच शेतकरी अनेक प्रसंगाला सामोरे जात आहे अतिवृष्टीतून कसेबसे बचावलेल्या सोयाबीनच्या ढिगाला अज्ञात व्यक्तीने आग लावली शेतकरी शंकरराव शामराव काटकळंबे व हणमंत परमेश्वर काटकळंबे चोंडी येथील राहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांची शेतजमीन देगलूर तालुक्यातील तडखेल शिवारात आहेत,दोन शेतकऱ्यांची अंदाजे सात ते आठ ब्याग सोयाबीन कापणी करून जमा करून ठेवलेल्या धिगाऱ्याला अज्ञात व्यक्तींनी आग लावलीयामुळे या शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेशेतांत राब राब राबून तोंडाला आलेला घास हिरवल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या घटनेची माहिती सरपंच प्रतिनिधी आदित्य पा चोंडीकर यांनी तडखेल  देगलूर तहसीलदार व तलाठी यांना या घटनेची माहिती दिली.ही घटना दिनांक १३ रोजीं रात्री घडली व १४ रोजीं तडखेल सज्जाचे तलाठी कापसे शेतांत पाहणी करून पंचनामा केला,या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिकमदत करावी अशी मागणी करण्यात आली,यावेळी सरपंच प्रतिनिधी आदित्य पा चोंडीकरपोलीस पाटील सचिन कांबळे ,तडखेल पोपा.मागिलवारमा.सरपंच पांडुरंग कंधारे,भाजपाचे मुजाहिद चोंडीकरगोविंद बसापुरे तयब पठाणशशिकांत देवकते गावातील शेतकरी शेतमजूर प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button