Uncategorized

मुखेड तालुक्यात हाहाकार! लेंडी धरण ओव्हरफ्लो, सहा गावांना पुराने वेढले; तिघांचा मृत्यू

मुखेड प्रतिनिधी:-  १८ ऑगस्ट २५

मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने लेंडी धरणातून आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने सहागावांना वेढा घातला. अनेक नागरिक अडकले आहेत, बचावकार्य सुरू आहे, पण तीन महिला दगावल्या आहेत.

जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सहा गावात मागील पंधरा पेक्षा जास्त तासापासून पूर परिस्थिती कायम आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस आणि लेंडी धरणाला आलेला पुर आल्याने तालुक्यातील भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव या गावांना पाण्याने वेढा घातला आहे. तीनशेहून अधिकनागरिक अडकले होते, त्यापैकी अनेकांना बाहेर काढून सुखरूप स्थळी हालवण्यात आले आहे. हसनाळ गावातील बेपत्ता असलेल्या पाचपैकी भीमाबाई मादाळे, गंगाबाई मादाळे आणि ललिताबाई भोसले या महिलांचा १५ तासाच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह आढळला आहे. तर पिराजी म्हैसाजी थोटवे, चंद्रकला विठ्ठल शिंदे हे अजून ही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.

गावात पूर आल्याने साठ पेक्षा अधिक जनावरे दगावल्याची माहिती आहे दुसरीकडे गावात पूर आल्याने गावकऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी काही जण झाडावर, मस्जिदीवर आणि घरातील छत, पत्रावर अडकून पडले होते. सकाळी एनडीआरएफ, पोलीस दल गावात पोहचून बचाव कार्य सुरु केले.आता पर्यंत २०० जनाना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. १५ तास उलटून ही गावात बचाव कार्य सुरु आहे. दरम्यान हसनाळ येथील पिराजी म्हैसाजी थोटवे, चंद्रकलाविठ्ठल शिंदे, ललिताबाई भोसले, भीमाबाई हिरामन मादाळे, गंगाबाई गंगाराम मादाळे हे बेपत्ता होते, त्यापैकी भीमाबाई मादाळे आणि गंगाबाई गंगाबाई मादाळे, ललिताबाई भोसले यांचा मृतदेह सायंकाळी आढळला आहे हसनाळ येथील नागरिकांनी संताप व्यक्त करत वेळेवर मदत मिळाली नसल्याचे आरोप केला आहे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button