ग्रामपंचायत शिपायांना आता आठवड्यातून तीन दिवस करावी लागणार शाळेची साफसफाई; नांदेड जिल्हा परिषदेचे सक्त आदेश

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : २९ ऑक्टोंबर २६
ग्रामपंचायत स्तरावर शिपाई म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता गावातील कार्यालयासोबतचशाळेचीही साफसफाई करावी लागणार आहे. या कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान तीन दिवसगावातील शाळेत साफसफाईचे काम करावे, असे स्पष्ट आदेश नांदेड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतविभागाने दिले आहेत.
जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्ह्यातीलसर्व पंचायत समित्यांच्या गट विकास अधिकाऱ्यांना (BDO) हे लेखी आदेश जारी केले आहेत. बऱ्याचदाग्रामपंचायतीचे शिपाई गाव आणि कार्यालयाची साफसफाई करतात, परंतु शाळेतील साफसफाई करतनाहीत, अशी बाब जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आली होती.
काय आहेत नियम आणि तरतुदी?
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ६१ अन्वये ग्रामपंचायतींना त्यांच्या आवश्यकतेनुसारकर्मचारी नेमण्याचे व त्यांचे वेतन ठरविण्याचे अधिकार आहेत.
मुंबई ग्रामपंचायत नोकरांबाबत (सेवेच्या शर्ती) नियम, १९६० मधील नियम ५ नुसार पंचायतीच्यानोकराने, सरपंचाने नेमून दिलेली कामे केली पाहिजेत, असे नमूद आहे.
या नियमांचा संदर्भ देत प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
गट विकास अधिकाऱ्यांना सूचना: तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना या निर्णयाबाबत लेखीकळविण्याची जबाबदारी गट विकास अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावरनिर्गमित करण्यात आलेल्या आदेशांच्या प्रती पंचायत समिती स्तरावर एकत्र करून जिल्हा परिषदेच्याकार्यालयास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कामात कोणताही विलंब होणार नाहीयाची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयाची कठोर अंमलबजावणी झाल्यास मुखेड तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातीलशाळांच्या स्वच्छतेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे.



