उमरखेड हादरले! वेल्डिंगदरम्यान भीषण स्फोट, दोघांचा करुण अंत

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क उमरखेड/यवतमाळ :- २७ सप्टेंबर २६
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात बैलबाजार भरणाऱ्या मैदाना समोर ब्लास्टिंग ट्रॅक्टरचे वेल्डिंग सुरु असताना सिलेंडरचा अचानक भीषण स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. याच पाच जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. तर दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमींना उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घडलेल्या घटनेनुसार, बैलबाजाराच्या मैदाना समोर ब्लास्टिंग ट्रॅक्टरच्या वेल्डिंगचे काम सुरू असताना सिलेंडरचा अचानक भीषण स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. जखमींना तात्काळपणे स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गंभीर जखमींपैकी काहींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले. या घटनेची माहिती मिळताच, उमरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, दुर्घटनेमागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केलाहोता. वेल्डिंग सुरू असताना नेमका स्फोट कशामुळे झाला? इतर संबंधित ट्रॅक्टर आणि सिलेंडरच्यासुरक्षिततेबाबत आवश्यक असणारी खबरदारी घेण्यात आली होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली आहे.
या भीषण दुर्घटनेमुळे उमरखेड परिसर हादरून गेला आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाआहे. पोलिसांच्या तपासानंतर स्फोटाचे नेमके कारण आणि दुर्घटनेची सविस्तर माहिती समोर येणारआहे.



