Sharmik Ekta
-
राजकीय
प्रदेश सरचिटणीस डॉ. श्रावण रॅपनवाड यांची औसा विधानसभा प्रभारीपदी निवड
मुखेड प्रतिनिधी:- १० सप्टेंबर काँग्रेस प्रदेश सरचिटणीस भारत यात्री डॉ. श्रावण रॅपनवाड यांची औसा विधानसभा प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे या नियुक्ती बदल सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने वरिष्ठ उपाध्यक्ष (प्रशासन) गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने राज्यातील विविध विधानसभा क्षेत्रांसाठी प्रदेश पदाधिकाऱ्यांची प्रभारी पदावर नियुक्ती जाहीर केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा राहुल गांधी यांच्या सोबत भारत जोडो यात्रा मध्ये ५ महिने राहून ४०८० किलोमीटर पदयात्रा केलेले डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी प्रदेश कमिटीतील वरिष्ठांना अवघडात अवघड विधानसभा क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्यांना औसा विधानसभा प्रभारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे. डॉ. रॅपनवाड यापूर्वी उस्मानाबाद आणि हिंगोली चे सहप्रभारी म्हणून काम पाहिले आहे. प्रदेशाकडून वरिष्ठ उपाध्यक्ष (प्रशासन) गणेश पाटील यांनी लातूर जिल्हा प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा प्रभारी जाहीर केले आहेत. प्रदेश सरचिटणीस डॉ. श्रावण रॅपनवाड यांच्या औसा विधानसभा प्रभारी पदावर निवडी बद्दल माजी मंत्री अमितभैया देशमुख, लातूर जिल्हाध्यक्ष अभय पाटील साळुंखे, माणिकराव…
Read More » -
शैक्षणिक
विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे -प्रसिद्ध कवयत्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांचे प्रतिपादन
▫️शिवाजी विद्यालयात मातोश्री स्व. सौ. सुलोचनाताई गुरुनाथराव कुरूडे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण संपन्न नांदेड प्रतिनिधी : ०८ सप्टेंबर विद्यार्थ्यांनी…
Read More » -
सामाजिक
भक्ती, उत्साह आणि जल्लोषाने गजबजले मुखेड … गणरायाला भावपूर्ण निरोप.
▫️शहरात ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन ▫️बंडे परिवाराची ३१ वर्षांपासून महाप्रसादाची परंपरा कायम ▫️पोलिस व प्रशासनाची चोख बंदोबस्त मुखेड प्रतिनिधी: दि ०७ सप्टेंबर आपल्या भक्तांनी मनोभावे केलेली सेवा व पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण स्वीकारून गणराय…
Read More » -
सामाजिक
मुखेडच्या मुस्लिम समाजाने जुलूस पुढे ढकलून सामाजिक सौहार्दाचा आदर्श ठेवत; सामाजिक सलोख्याचा संदेश दिला
▫️ईद–ए–मिलाद जुलूस डीजे मुक्त काढण्याचे निर्धार मुखेड प्रतिनिधी:- ०४ सप्टेंबर मुखेड शहरात गणेश विसर्जनादरम्यान हजारो भाविक एकत्र येतात, त्यामुळे वाहतूक आणि सुरक्षेचे मोठेआव्हान पोलिसां पुढे असते. अशा परिस्थितीत मुस्लिम समाजाच्या या निर्णयामुळे पोलिस प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे मुखेड शहरातील मुस्लिम समाजाने सामाजिक सलोखा आणि आंतरधर्मीय सौहार्द जपण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यंदा ५ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश विसर्जन आणि ईद–ए–मिलादुन्नबी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्यानं, मुस्लिम समाजानं आपला पारंपरिक जुलूस ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबर २०२५ सोमवार रोजी काढण्याचा निर्णय…
Read More » -
शैक्षणिक
भटक्या विमुक्तांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागकटिबद्ध :- सचिन खुणे
▫️विविध उपक्रमाच्या आयोजनाने भटके विमुक्त दिवस साजरा मुखेड प्रतिनिधी:- १ सप्टेंबर भटक्या विमुक्तांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे उत्तरदायित्व आणि कटिबद्धता इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि आश्रम शाळा शिक्षकांच्या खांद्यावर असल्याचे प्रतिपादन या विभागाचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे. इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय नांदेड आणि विमुक्त जाती सेवा समिती शैक्षणिक संकुलाच्या संयुक्त विद्यमाने भटके विमुक्त दिवसाचे औचित्य साधून एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष पदावरून सचिन खुणे बोलत होते. या कार्यक्रमास इतर मागास बहुजनकल्याण अधिकारी श्री उमेश मोरे, प्रसिद्ध वक्ते तथा प्रा. डॉ. रामकृष्ण बदने, प्रा. डॉ. देविदास पवार, सेवानिवृत्त राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श मुख्याध्यापक गोविंदराव चव्हाण, प्राचार्य भगवान मरकटवाड, प्राचार्य सोपानराव वाघमारे, मुख्याध्यापक गोविंद पवार, मुख्याध्यापक संदीप गेटकेवार, मुख्याध्यापक संदीप परकंठे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना सहाय्यक संचालक सचिन खुणे पुढे म्हणाले की, इतर मागास बहुजन कल्याणविभागाच्या वतीने यावर्षीपासून 31 ऑगस्ट रोजी भटके मुक्त दिवस साजरा करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आज हा दिवस आपण मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करीत आहोत.भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी आणि उत्कर्षासाठी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. आपला विभाग अत्यंत सजगतेने आणि कार्यक्षमपणे कार्यरत असून विभागाच्या वतीने नाविन्यपूर्ण असे वेगवेगळे उपक्रम भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी राबवित आहे. तरीही परंतु भटक्या विमुक्तांचा विकास ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने झालेला नाही यासाठी भटक्या विमुक्तांना समाजाच्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची सर्वस्वी जबाबदारी इतर मागास बहुजन कल्याण विभागाची आणि या विभागामार्फत चालणाऱ्या आश्रम…
Read More » -
संपादकीय
फोटोसेशनपेक्षा नागरिकांना प्रत्यक्ष मदत करा – राहुल भाऊ नावंदे
▫️अतिवृष्टीने मुखेड तालुका जलमय; बसव फाउंडेशनच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य मुखेड प्रतिनिधी:- ०१ सप्टेंबर फोटोसेशनपेक्षा नागरिकांना प्रत्यक्ष मदत करा अशी खणखणीत भूमिका बसव फाउंडेशनचे संस्थापकअध्यक्ष राहुल भाऊ नावंदे यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे. मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक नागरिकांचे घरे उद्ध्वस्त झालीअसून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले, जनावरे दगावली, तरमुखेड शहरासह तालुक्यातील मोठ्या प्रमाणातील मालमत्ता पावसामुळे बाधित झाली आहे. या गंभीरपरिस्थितीत नागरिकांना तातडीची मदत मिळणे अपेक्षित असताना, अनेक नेते व लोकप्रतिनिधी फक्तपाहणी दौरे करून, छायाचित्र काढण्यात गुंतले आहेत. यावर बसव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ नावंदे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, *“सध्या नागरिकांवर संकट कोसळले असताना नेत्यांनी बांधावर उभे राहून किंवा दौरे करून फोटो काढण्या पेक्षा प्रत्यक्ष मदतीला धावून यावे. शासनाचीमदत मिळेपर्यंत नागरिक उपाशी आहेत, त्यांना तातडीची मदत पोहोचवणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. सत्तेत असलेले नेते देखील फक्त फोटो काढून लोकांमध्ये दिखावा करत आहेत. पण वैयक्तिक मदत कोणाच्याही घरपोच पोहोचत नाही, ही वस्तुस्थिती आहे.”* याच पार्श्वभूमीवर राहुल भाऊ नावंदे यांनी स्वतः पुढाकार घेत समाजकारणाचा आदर्श ठेवला. त्यांच्याघरी अलीकडेच दुःखद घटना घडली – त्यांचे आजोबा लिंगैक्य मारोती शंकर नावंदे यांचे वयाच्या १०१व्या वर्षी, दिनांक १५ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. या कारणास्तव त्यांनी यावर्षी दहीहंडीउत्सव साजरा न करता समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला. दिनांक ३० ऑगस्ट रोजी कंधार तालुक्यातील दिग्रस गावात छोट्या कार्यक्रमात त्यांनी समाजकारणाला प्राधान्य देत नागरिकांच्या सेवेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. या वेळी श्रीपादेश्र्वर शिवाचार्यमहाराज गीरगावकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. ही रुग्णवाहिका त्यांच्याआजोबा लिंगैक्य मारोती शंकर नावंदे यांच्या स्मरणार्थ मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी उपलब्धकरून देण्यात आली. या उपक्रमातून नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचा आदर्श राहुल भाऊ नावंदे यांनी दाखवला आहे. मदतीसाठी शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची असते, हे त्यांनी आपल्या कार्यातून अधोरेखित केले आहे. दौर्यांवरून नेत्यांवर टीका पूरपरिस्थितीत अनेक नेते व लोकप्रतिनिधी दौरे करताना दिसत आहेत. मात्र हे दौरे फक्त छायाचित्रांपुरतेमर्यादित असून, नागरिकांना मदतीचा लाभ होताना दिसत नाही. यावर बसव फाउंडेशनचे संस्थापकअध्यक्ष राहुल भाऊ नावंदे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.ते म्हणाले, “मी विधानसभा निवडणूक लढलो, परंतु पराभव झाला. आज आम्ही सत्तेत नाही, आमच्याकडेसाधनसामग्री नाही, त्यामुळे आम्ही दौरे केले नाहीत. मुळात मला फक्त फोटो काढून प्रसिद्धी करायचीनाही. पण सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी मात्र दौरे करूनही एक रुपयाचीही मदत नागरिकांना पोहोचवूशकलेले नाहीत. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे.”
Read More » -
सामाजिक
युवा उद्योजक राहुल नावंदे यांच्या वतीने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न
▫️समाजाचे देणे फेडण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा:- नावंदे मुखेड/प्रतिनिधी ३१ ऑगस्ट कंधार तालुक्यातील दिग्रस बु. येथील युवा उद्योजक तथा बसव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुलभाऊ नावंदे हे नेहमीच ह्या ना त्या चांगल्या कारणांनी चर्चेत असतात. त्यांच्या सामाजिक कार्याची नोंदयेथील जनता घेत असून त्यांच्या समाज कार्याला आणखीन एका गोष्टी मुळे चर्चेला उधाण आले आहे. राहुल भाऊ नावंदे यांचे आजोबा लिंगैक्य. मारोती शंकर नावंदे यांच्या पुण्य स्मरणार्थ शनिवार दि ३० ऑगस्ट रोजी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा सद्गुरू गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर यांच्या शुभ हस्ते मोठ्या…
Read More » -
सूचना:-
या श्रमिक एकता न्युज वेब पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तरसंबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्त संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो मुखेड न्यायालयांतर्गत राहील
Read More » -
सामाजिक
मुंबई येथे मराठा आरक्षण आंदोलनात लातूरच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, आंदोलकांमध्ये हळहळ
▫️दोन दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वरडगाव येथील सतीश देशमुख हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता मृत्यू ३० ऑगस्ट मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू…
Read More » -
Uncategorized
स्वतःच्या जीवाची बाजी लावून शेतकऱ्याला वाचवले : शेख बाबू पटेल यांच्या शौर्याला सलाम !
▫️लेंडी नदीत बुडणाऱ्या शेतकऱ्याला जीवनदान– बागन टाकळी ग्रामपंचायतीकडून सत्कार; शासनानेही दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी मुखेड प्रतिनिधी:- ३० ऑगस्ट देगलूर तालुक्यातील बागन टाकळी गावाचे शेख बाबू पटेल यांनी दाखवलेले धाडस आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. देगलूर शहराजवळील लेंडी नदीवर सकाळच्या वेळी शंकर पाटील विभुत्ते (रा. खानापूर) हे शेतकरी पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जात होते. मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असताना बाबू पटेल यांनी जीवाची पर्वा न करता नदीच्या पाण्याच्या वेगाच्या प्रवाहात धावत त्यांना सुरक्षित बाहेर काढले. गावकऱ्यांच्या उपस्थितीत हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. पाण्याच्या प्रवाहाशी दोन हात करूनत्यांनी एका शेतकऱ्याचे जीवन वाचवले. या घटनेनंतर बागन टाकळी ग्राम पंचायतीचे उपसरपंच मौलापटेल…
Read More »