Uncategorized
-
होनवडज येथे रामनवमी निमित्त जंगी कुस्त्यांचे सामने रंगले.
शेवटच्या कुस्तीचे पारितोषिक विजय पाटील सुगावकरांच्या हस्ते प्रदान. मुखेड / प्रतिनिधी. मुखेड तालुक्यातील मौजे होनवडज येथे श्रीराम नवमी निमित्त जंगी…
Read More » -
धामणगाव येथे १२ एप्रिल रोजी हजरत सय्यद बाबुपिर रह अलै उर्स शरीफ
१३ एप्रिल रोजी इम्रान वारसी व रौशनी वारसी यांच्या कव्वालीचा जंगी मुकाबला मुखेड/प्रतिनिधी:- दि ०९ एप्रिल २५ मुखेड तालुक्यातील मौजे धामणगाव येथे हजरत सय्यद बाबुपिर रह अलै उर्स शरीफ निमित्त शनिवार दि.१२एप्रिल २०२५ रोजी भव्य संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही संदल मिरवणूक रात्री १०:३० वाजताच्या दरम्यान माली पटेल यांच्या वाड्यातून निघून गावातील प्रमुख मार्गाने जावून पुढे हजरत सय्यद बाबुपिर दर्गा शरीफ पोहचणार आहे. रविवार दि.१३ एप्रिल रोजी सायंकाळी ४:०० वा. भव्य कुस्त्या रंगणारआहेत. तर रात्री ठिक ८:०० वा. दर्गाह परिसरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक तथा प्रसिद्ध शायर इम्रान वारसी (मुंबई) व रौशनी वारसी (टिव्ही सिंगर, मुंबई यांच्या शानदार कव्वाली चा मुकाबला होणार असल्याची माहिती ह. सय्यद बाबुपीर दर्गाह कमिटीतील उमर पटेल, निजाम पटेल, रियाज पटेल, मकसूदपटेल, बाबा पटेल, पाशा पटेल, जीलानी पटेल, हमीद पटेल यांनी व या ऊर्स कमिटी चे अध्यक्ष जैनु पटेल, उपाध्यक्ष इब्राहिम पटेल, सचिव इसाक पटेल, कोषाध्यक्ष मलिक पटेल इत्यादींनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातुन कळवीले आहे. परिसरातील जनतेनी ह. सय्यद बाबुपिर उर्स संदल मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच भव्य कुस्त्यांचा आणि कव्वाली च्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहनही उर्स कमिटी वदर्गा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे
Read More » -
डॉ. शफी अहेमद यांचा पुंडे हॉस्पिटलच्या वतीने सत्कार संपन्न
मुखेड/प्रतिनिधी ‘संचेती’ हॉस्पिटल पुणे येथे नावलौकिक मिळवलेले डॉ. शफी अहेमद हे एम.बी.बी.एस. नंतर एम. एस. (ऑर्थो) उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा मुखेड…
Read More » -
आलेगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने ७ शेतमजूर महिलांचा मृत्यू तर ३ जखमी
प्रशासनाकडून तातडीचे मदत कार्य • प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर नांदेड, दि. ४ एप्रिल :- नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे आज…
Read More » -
जिजाऊ रथयात्रा ६ एप्रिल रोजी मुखेडात ,स्वागताची जय्यत तयारी!
मुखेड प्रतिनिधी:- मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडो अभियानांतर्गत भोसले गडी वेरूळ ते लाल महाल पुणे अशी राज्यभर जिजाऊ रथयात्रा…
Read More » -
अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा : महसूल मंत्री बावनकुळे
महसूल मंत्री यांच्या आदेशानुसार मुखेडचे तहसीलदार अवैध गौण खनिजावर कार्यवाही करतील काय? मुखेड प्रतिनिधी- अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतूक…
Read More » -
नांदेड जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची जळगाव येथे मुख्य कार्यकारीअधिकारी म्हणुन बदली तर कवली मेघना नव्या सीईओ;
नांदेड दि. 18 मार्च : किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक मेघना कावली नांदेड जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी…
Read More » -
अबिनाश कुमार यांच्या हस्ते उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून माधव टाकळे सन्मानित
मुखेड प्रतिनिधी:- शहराचे पोलीस पाटील माधव टाकळे यांना उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून ११ मार्च रोजी नांदेड येथे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पोलीस पाटील हे पोलिसांचे एक महत्त्वाचे अंग असून, गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस पाटलांना विशेष पुरस्कार देण्याचा मानस पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केली, या अनुषंगाने जिल्हा आदर्श पोलिस पाटीलपुरस्कार २०२५‘ हा नांदेड जिल्हा पोलीस पाटील मेळावा व कार्यशाळा यात प्रदान करण्यात आला. यावेळीअप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, खंडेराय धरणे, पोलीस उपअधीक्षक अश्विनी जगताप यांच्यासह पोलीस कर्मचारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. तर पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक फड, पोना पांडुरंग पाळेकर यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी माधव टाकळे यांचेअभिनंदन केले
Read More » -
परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवण्यासाठी पैसे मागितले
एसएफआय ने आरोप करीत कारवाईची मागणी केली मुखेड/प्रतिनिधी मुखेड उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (एच.एस.सी) बैठी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर परीक्षा…
Read More » -
जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूल मध्ये राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस साजरा
श्रीरामे डेंटल हॉस्पिटलच्या वतीने २८६ विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्याची मोफत तपासणी मुखेड / प्रतिनिधी:- राष्ट्रीय दंत चिकित्सक दिन व जागतिक महिला दिना निमित्य मुखेड येथिल श्रीरामे डेंटल हॉस्पिटलच्या वतिने वैद्यकीय संस्थेचे माजी सचिव दंतरोगतज्ञ डॉ.पांडुरंग श्रिरामे,डॉ.जावेद शेख यांनी मुखेड शहरातील पिएमश्री, आदर्श शाळा,जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूल मधिल २८६ विद्यार्थ्यांना दंत व मुख आरोग्याच्या संदर्भात मार्गदर्शन करुन सर्वांची दंततपासणी करण्यात आली.याप्रसंगी प्रशालेच्या वतीने डॉ .श्रीरामे व डॉ .शेख यांचा सत्कार करण्यात आले. लहान मुलांच्या दातांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यांचे दात नाजूक असतात आणि भविष्यात दातांच्या आरोग्यावर त्याचा प्रभाव पडतो. यामुळे लहान वयात त्यांच्या दातांची योग्य काळजी घेतल्यास पुढील काळात चांगले दंत आरोग्य टिकवता येते असे प्रतिपादन दंतरोगतज्ज्ञ डॉ. पांडुरंग श्रीरामे यांनी मुखेड येथील जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूल मुखेड येथे केले. …
Read More »