Uncategorized
-
वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावणाऱ्या कोल्हेगावचे उपसरपंचावर कारवाई करण्याची मागणी
मुखेड प्रतिनिधी:- वारकरी संप्रदायातील अतिशय पवित्र असणाऱ्या विण्याला दारूची बाटली लावून सोशल मिडीयावर फोटोव्हायरल करणाऱ्या हरेश जोशी यांचा निषेध करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे, अशी मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनेने केली आहे. कोल्हेगावचा उपसरपंच हरेश रामदास जोशी याने संप्रदायातील अतिशय महत्त्वाचा व पवित्र अशा विण्याला दारूची बाटली लावून सोशल मिडीयावर फोटो व्हायरलकेल्याप्रकरणी संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे याच्यावर कठोर कार्यवाहीकरावी व त्याला जेलबंद करण्यात यावे असे मागणी पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनातून करण्यातआली आहे. या निवेदनावर बजरंग कल्याणी, शंकर पाटील लुट्टे, पवन पोतदार, गजानन लोखडे, संभाजीमिद्देवाड, संजय मुद्देवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Read More » -
नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन
मुखेड:प्रतिनिधी जून 2024 मध्ये जनतेने खासदार पदावर विराजमान केलेले वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे हैदराबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या दिनांक 27 ऑगस्ट रोजीअंतिम संस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण हे मागील काही दिवसांपासून आजारीहोते. त्यांच्यावर हैदराबादच्या रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु त्यांच्या उपचाराला प्रतिसाद आला नाहीआणि त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अंतिम संस्कार केलेजाणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती यांनी दिली आहे. खासदार पदावर विराजमान झाल्यानंतर परमेश्वराने त्यांना खूप कमी वेळ दिला, त्यांच्या चाहत्यांमध्येदुःखाची छाया पसरली आहे. श्रमिक एकता न्यूज परिवार,शेतकरी कामगार पक्ष मुखेड सुद्धा चव्हाणकुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.
Read More » -
विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत जि.प. मुलींचे हायस्कूल जिल्ह्यात प्रथम.
विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड ; १० शाळांनी नोंदवला होता सहभाग. मुखेड / प्रतिनिधी. राष्ट्रीय संग्रहालय परिषद भारत सरकार, नेहरू विज्ञान केंद्र…
Read More » -
मुखेडच्या तहसील कार्यालयात नायब तहसीलदार, अव्वल कारकूनची पदे रिक्त
मुखेड प्रतिनिधी मुखेड तहसील कार्यालयातील एकूण चार नायब तहसीलदार पैकी ०२ नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. यामध्येतालुक्यातील गोरगरीब सर्वसामान्य कुंटुबातील जनतेला स्वस्त धान्य दुकानदारांच्या मार्फत धान्य पुरवठा करणारेमहत्वाचे विभाग पुरवठा विभागातील नायब तहसीलदार पद मागील आठ महिन्यांपासून रिक्त आहे. तसेच निवडणूकविभागातील नायब तहसीलदार पद व अव्वल कारकून पद सुद्धा रिक्त असल्यामुळे नागरिकांचे कामे खोळंबली आहेतत्यामुळे तहसिल कार्यालयातील रिक्त असलेली पदे तात्काळ भरुन जनतेची होत असलेली गैरसोय थांबवावी अशीमागणी तालुक्यातील सुज्ञ नागरिकांतुन होत आहे नुकतच ३१ में रोजी तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार अशोक लबडे, अव्वल कारकून गुलाब शेख व इतर तीनअधिकारी व कर्मचारी नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे येथील पदे रिक्त झाली आहेत. पुरवठाविभागाचा कारभार तर प्रभारी अधिकाऱ्यावरच चालत आहे. तहसील कार्यालयात महसूल १, महसूल २, निवडणूक, पुरवठा अशा चार विभागासाठी ०४ नायब तहसीलदार कार्यरत असतात यामध्ये महसूल विभाग १ ला पांडुरंग गंगणर तरमहसूल विभाग २ ला नंदकुमार भोसीकर आहेत तसेच पुरवठा विभागास तात्कालीन नायब तहसीलदार विजयकुमारपाटे यांची ऑक्टोबर २०२३ ला बदली झाल्यापासून हे पद प्रभारीवरच आहे. महसूल १ चे नायब तहसीलदार पांडुरंगगंगणर यांना पुरवठा विभागाचे अतिरिक्त पदभार देण्यात आले आहे. त्यामुळे रिक्त असलेली पदे भरुन नागरिकांचीगैरसोय टाळण्याची मागणी नागरिकांतुन केल्या जात आहे
Read More » -
चांडोळा येथे रेती माफीयाची फिल्मी स्टाइल तलवार,खंजरने मारहाण
मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे रेती माफीयात व मुखेड येथील दोघांत गाडीला धडक दिल्याने झालेल्या झटापटीचे रूपांतर तलवार व खंजरच्या मारहाणीत…
Read More » -
मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक समीरकुमार ओ.जे नांदेडमध्ये दाखल
नांदेड :- 16 नांदेड लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणी उद्या 4 जून 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे…
Read More » -
जि.प.मुलींचे हायस्कूलचा ९९.४५ टक्के निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम.
वेदीकाने मिळविले १०० टक्के गुण तर ९६ टक्केच्या वर ०५ विद्यार्थी. मुखेड / प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक…
Read More » -
कोळगावच्या मतदारांनी केला मतदानावर बहिष्कार; नागरिकांनी एकही मतदान केले नाही
मुखेड प्रतिनिधी:- मुखेड तालुक्यातील मौजे कोळगाव येथून शहराला जोडणाऱ्या रस्त्याची वारंवार मागणी करूनही हा रस्ता मंजूर होत नसल्याने येथील गावकऱ्यांनी…
Read More » -
मुखेड मतदारसंघात अंदाजे ६० टक्के मतदान
भर उन्हात ९० वर्षीय रहमतबी चांदसाब शेख यांनी मतदान केले. लग्नाची दाट तिथी व कडक उन्हामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याची…
Read More » -
नांदेड लोकसभेसाठी अंदाजे 65 टक्के मतदान
नांदेड प्रतिनिधी:- दि 26-16- नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सहाही विधानसभा मतदार संघात 2 हजार 62 मतदान केंद्रावर मतदान पार…
Read More »